औद्योगिकरण व शहरीकरण हा एक शाप

स्ट्रेलियात जंगले जळत आहेत. यावेळच्या वणव्यांमधे ताज्या माहितीप्रमाणे सुमारे १०० कोटी प्राणिमात्रांची आहुती पडली आहे. हजारो इमारती जळत आहेत. माणसे मरत आहेत, स्थलांतर करत आहेत. ___ जंगलांची राख पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांत जात आहे. म्हणून शहरांनाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तापमान जागोजागी ५०ओसे वर जात आहे. वीजेची उपकरणे काम करत नाहीत. शहरांचा वीजपुरवठा बंद पडत आहे. ही असाधारण परिस्थिती पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे निर्माण झाली आहे. सन १७५६ सालात जेम्स वॅटचे वाफेचे इंजिन अवतरले. सुमारे ३०० कोटी वर्षांपासुन हरितद्रव्यरूपी सूक्ष्मजीवांनी, गेल्या ४५ कोटी वर्षांत भूमीवरील वनस्पतींतील हरितद्रव्याने व त्यापेक्षा जास्त काळ सागरातील वनस्पतींनी, प्रकाशसंश्लेषणाद्वारे शोषलेला, पृथ्वीच्या पोटात कोळसा, तेल व वायूरुपात साठलेला कार्बन, स्वयंचलित यंत्रांना ऊर्जा पुरवण्यासाठी, बाहेर काढून जाळला. या वेगाने वातावरणात गेलेल्या कार्बनच्या उष्णता शोषणाच्या गुणधर्मामुळे तापमानाच्या संदर्भात काळाचे चक्र उलट फिरवले गेले, हे या तापमानवाढीचे कारण आहे.


__ याच औद्योगिकरणात वस्तुनिर्मितीसाठी, वीजनिर्मिती सीमेंट स्टील इ. बांधकाम साहित्य, वाहननिर्मिती, रासायनिक यांत्रिक शेतीसाठी, लागणारी रसायने इ. खनिजांसाठी खाणी करून व रस्ते करून पृथ्वीवरील डोंगर त्यावरील जंगलांसह खणून काढले गेले. कार्बन शोषणारे हरितद्रव्याचे नैसर्गिक अविष्कार नष्ट करून शहरे उभी केली गेली. ठोक राष्ट्रीय उत्पादन वाढवणे म्हणजे प्रगती व विकास मानल्याने या प्रक्रियेत, वातावरणातील काबेनमधे सतत वाढ होत गेली व हरितद्रव्याचा नाश होत राहिला.


__पॅरिस करारात, मानवजात वाचवण्यासाठी रोखणे आवश्यक आहे, असे सांगितलेली, पृथ्वीच्या सरासरी तापमानातील २ओसे ची निर्णायक वाढ चालू वर्षी सन २०२० मधे होत आहे. सन २०१६ पर्यंत १.२ ओसे ची वाढ झाली होती. १६ पासुन प्रतिवर्षी ०.२० ओसेची महाविस्फोटक वाढ सुरू झाली. ६ नोव्हेंबर २०१७ ला जागतिक हवामान संघटनेने तापमानवाढ अपरिवर्तनीय झाल्याची म्हणजे तापमान वाढत राहणार असल्याची अधिकृत घोषणा जर्मनीतील 'बॉन' शहरात झालेल्या युनोच्या परिषदेत केली. खरेतर ही जगाला हादरवणारी व रूढ संकल्पना मोडून फेकण्यास सांगणारी घटना आहे. औद्योगिकरण चालू राहिल्यास मानवजात व जीवसृष्टी नष्ट होणार आहे , पण याची जाणीवही मानवजातीलाच नव्हे तर स्पेनची राजधानी माद्रीद मधे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज - २५ या परिषदेसाठी जमलेल्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींना असल्याचे जाणवले नाही.


आपल्या देशातही अर्थमंत्री निर्मला सीतारामन' यांनी अर्थव्यवस्थेला उभारणी देण्यासाठी १०२ लाख कोटी रू. उतरवणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र सरकारही उद्योगपतींबरोबर हाच विचार करत आहे. यातून भौतिक वस्तनिर्मिती अधिक वेग घेईल. सन २०१८ मधील कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात ८५% वाटा वाहनांचा व वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळण्याचा आहे. ९% वाटा सीमेंट निर्माणाचा आहे. या ९४% शिवाय उरलेले उत्सर्जन इतर वस्तुनिर्मितीचे आहे. हे उत्सर्जन शून्य करण्याची गरज असताना प्रत्येक गुंतवणुक त्यात प्रचंड वाढ करणार आहे. आता औद्योगिक युगातील, मेक इन............ ........ इज अंडर कन्स्ट्रक्शन आणि स्टार्ट अप अशा कल्पनांना सोडचिठी देण्यात यावी. पृथ्वी फक्त जीवन देण्यासाठी आहे. नोकरी देण्यासाठी नाही. ही गोष्ट या क्षणी समजली नाही तर लवकरच, पृथ्वी जीवन देण्यासाठी होती, अशी स्थिती येईल व हे सांगायला आणि ऐकायला कुणी नसेल.


ही अस्तित्वासाठी आणिबाणी आहे. जगभर मोटारीचा त्याग करण्याची गरज आहे. कारण मोटारीचा उत्सर्जनात ४०% प्रत्यक्ष व मोटारीसाठी होणारी रस्ते निर्माण व खह मोटार निर्मितीसह सुमारे ७५% वाटा आहे. मोटार ही 'शवपेटी' आहे असे म्हणण्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. वीज व सीमेंटबाबतही हेच आहे. 'विकास' हा नैतिक, अध्यात्मिक, भावनिक, मानसिक, बौध्दीक अस शकतो. पण भौतिक नाही. प्रेम विश्वास ज्ञान सत्य तत्व व त्यांच्यावरील श्रद्धा यांच्या अभावामळे भौतिक वस्तुंची आसक्ती तयार होते. 'उद्योगपती' हा माणूस म्हणून वेगळा व त्याचा उद्योग म्हणजे त्याची कृति वेगळी. हा माणुस म्हणुन हवा पाणी अन्नामुळे जगतो. त्याच्या उद्योगामळे नाही. तीच गोष्ट त्यांच्या उदयोगातील कर्मचारी कामगारांबाबत आहे. कोणताही उद्योग आपल्याला कधीही जगवत नव्हता. उदरनिर्वाह पृथ्वी करत होती, उद्योग नव्हे. मोटार, सीमेंट, वीजनिर्मिती इ. सर्व उद्योग बंद झाले तर तुम्ही मरणार नाही. पण ते थोडा काळही चालू राहिले तर खचितच मराल. हे एका पिढीपुरते नाही तर मानवजात व जीवसृष्टीचा पृथ्वीवरून कायमचा अंत होत आहे. हे लक्षात न येणे हीच माया आहे. वणव्यांमधे जळत असलेले झाडाचे एखादे पानदेखील हे उद्योग निर्माण करू शकत नव्हते.


भौतिक, तांत्रिक व आर्थिक दृष्ट्या विकसित समाज सर्वात अयोग्य आहेत. अविकसित सर्वांत योग्य आहेत. या दृष्टीने न्यूयार्क शांघाय मुंबई ही समस्या व जंगलातील आदिवासी व कृषियुगाप्रमाणे आताही जगणारे शेतकरी हे समस्येचे उत्तर आहे. ___भौतिक दृष्टीने विकसित होण्याच्या कल्पनेने हे जग पछाडले आहे. शिक्षणामुळे सर्वांना नोकऱ्या हव्या आहेत. पण पृथ्वी याला मान्यता देत नाही, याचे कुणाला भान नाही. पृथ्वीलाजीवनाला व सृष्टी आणि मानव यांच्यातील परस्पर संबंधाला केंद्रस्थानी ठेवून विचार करण्याची तात्काळ गरज आहे. कारण तोच खरा विचार असू शकतो. __ औद्योगिक युगातील एका कप्प्यात स्वतः ला बंदिस्त (कम्पार्टमेंटलाइज्ड थिंकिंग) करून विचार करणे, तातडीने थांबवले पाहिजे. येथे भांडवलशाही, समाजवादी की साम्यवादी विचारसरणी हा प्रश्न नाही. हा त्यापलीकडचा प्रश्न आहे. येथे जे जे भांडवल स्वयंचलित यंत्र रासायनिक पदार्थ निर्माण, कार्बन उत्सर्जन करते व हरितद्रव्याचा नाश करते, पृथ्वीची मूळ बैठक मोडते ते ते चुकीचे ठरते. भांडवल- पैसास्वयंचलित यंत्र यांना पृथ्वीवर कोट्यावधी वर्षे स्थान नव्हते व तेच योग्य होते.


गेल्या काही हजार वर्षांच्या काळात मानवी जीवनात अनेक कार्यक्षेत्रे निर्माण झाली. आज मानवजातीचे व जीवसृष्टीचे उच्चाटन होत असताना, माणसे बधिरपणे, हा आमचा विषय नाही, हे आमचे क्षेत्र नाही, असे म्हणताना दिसतात. औद्योगिकरणाने माणसाला किती संवेदनहीन व अलिप्त, उदासीन बनवले आहे हे पाहिले की धक्का बसतो व जाणवते की स्वयंचलित यंत्र, औद्योगिकरण व शहरीकरण हा शाप आहे. जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करणे हा यांचा विषय नाही. तो कुणीतरी करेल असे यांना वाटते. हा मठ्ठपणा किंवा स्वार्थीपणाची हद्द आहे. मग निःस्वार्थीपणातुन व त्यागातून आलेल्या विज्ञानाचा जयजयकार तरी करू नका. विज्ञानाचे मानवजातीच्या सुखाचा दावा करून आलेले उपयोजित रूप म्हणजे 'तंत्रज्ञान'. हे जग तंत्रज्ञानात गुंग होऊन विज्ञानाला अव्हेरत, फेटाळत आहे. ही निर्वाणीची वेळ आहे. औद्योगिकरणापासुन परतीच्या वाटेची व रक्षणाची सधी असलेल, ५ ते १० हजार वर्षांच्या ऊर्जाविरहित कृषियुगाकडे परत वळण्याचे हे शेवटचे वर्ष आहे. लेखक -


अॅड. गिरीश राऊत


भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ


दू. ९८६९०२३१२७