संजय राऊत शाब्बास

तुम्ही छत्रपती शिवरायांची याद दिलीत!


या सगळ्या धकाधकीत त्यांची अँजिओप्लास्टी झाली. ते दवाखान्यात होते पण तिथूनच त्यांनी लेखणी आणि वाणी या दोन शस्त्रांद्वारे झुंज दिली. भल्या-भल्यांनी मैदानातून पळ काढलेला असताना त्यांनी जीवाजी महालांच्या दांडपट्यासारखा राजकीय मुत्सदेगिरीचा दांडपट्टा चालवला. राजकारणाच्या सारीपाटावर नवीन समिकरणं जुळवत भाजपाची मग्रुरी उतरवली. मोदी शहांची रसद घेवून बेफाम झालेल्या फडणवीसांचा माज त्यांनी उतरवला. शरद पवारांच्या आणि उध्दव ठाकरेंच्या ताकदीवर त्यांनी राज्यात सत्तांतर केले. या काळात संजय राऊत राज्याच्या घरा-घरात पोहोचले. सर्वो तमुखी त्यांचे नाव झाले. यापूर्वी ते सामनाच्या ज्वलजहाल अग्रलेखांसाठी, सामनाच्या उत्सव पुरवणीतील रोखठोक या धडाकेबाज सदरासाठी आणि बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जात होते. : परवाच्या राजकीय संघर्षात त्यांचा रोखठोक धडाका महाराष्ट्राने अनुभवला.



लेखणीनेच नव्हे तर वाणीनेही कशी ठोकाठोकी करतात ते महाराष्ट्राने अनुभवले. सोशल मिडीयात त्यांच्यावर अनेक विनोद झाले, गम्मती-जमती झाल्या. त्यावेळी पाऊस आणि संजय राऊत राज कपूरच्या गाण्यासारखे राज्यभर हिट झाले. कोणतेही चॅनेल लावले तर तेच दिसायचे. प्रत्येक चॅनेलवर संजय राऊत आणि त्यांच्याच डरकाळ्या सुरू होत्या. संजय राऊतांच्या या धडाक्याने त्यांनी लाखो लोकांच्या मनात घर १९ केले. परवा राज्यसभेत ते ज्या पध्दतीने अमित शहांसमोर बोलेले त्याचा अभिमान वाटला. त्यांच्या दिल्लीतील डरकाळीने छत्रपती शिवरायांची याद आली. भाजप सरकारने जबरदस्ती आणलेल्या नागरिकता या विधेयकावर राज्यसभेत चर्चा करताना ते ज्या पध्दतीने बोलले त्याचा खऱ्या अर्थाने अभिमान वाटला. क्षणभर साडे तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. आज जसा सत्तेचा माज दिसतो आहे, अहंकार दिसतो आहे तसाच तो औरगजेबी सत्तेत दिसत होता.


दिल्लीपती औरंगजेबाच्या सत्तेत जशी घमेंड होती, जसा माज होता तशीच घमेंड, तसाच माज आजच्या सत्तेत आहे. आम्ही जे करू तेच योग्य, आम्ही म्हणू तीच देशभक्ती, आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा अशी घमेंड केंद्रातल्या सत्तेत आणि सत्ताधाऱ्यांच्यात दिसते आहे. त्यामुळेच देशाचे गृहमंत्री नागरिकता विधेयकास विरोध करणाऱ्या लोकांवर पाकिस्तानी भाषा बोलत आहेत असा आरोप करतायत. लोकमत डळमळले, लोकांत रोष वाढला की भाजपवाले देशभक्तीचा खेळ खेळतात. : देशातल्या देशात भारतपाकिस्तानचा खेळ खेळतात. देशातल्याच विरोध करणाऱ्या लोकांना पाकिस्तानी, देशद्रोही ठरवले जाते. . लोकांना भावनिक करून देशांतर्गत विरोधाला देशद्रोहाचा मुलामा देवून लोकांची तोंडे बंद करतात. हा प्रकार गेल्या पाच वर्षापासून तेजीत आहे. देशभक्तीची सापशिडी नेहमीच उपयोगाला येईल या भ्रमात ते आहेत.


पण त्यांचा हा भ्रम लवकरच उतरेल असे वाटते आहे. सत्तेचा माज डोक्यात असल्याने ते घमेंडीत आहेत. कणालाही देशद्रोही आणि पाकिस्तानी ठरवत आहेत. त्यांच्या याच औरंगजेबी घमेंडीला . संजय राऊतांनी जबरदस्त आव्हान दिले. ते ही दिल्लीतच दिले. राज्यसभेत राऊतांनी जी डरकाळी फोडली त्यांने छत्रपती शिवरायांच्या डरकाळीची याद आली. पुरंधरच्या तहात हरल्यावर आग्रा भेटीवर गेलेल्या छत्रपती शिवाजी राजांना लाल किल्ल्यात शेवटच्या रांगेत उभे केले होते. मागल्या रांगेत उभे केल्याने स्वाभिमान दुखावलेल्या शिवरायांनी औरंगजेबाच्या दरबारात स्वाभिमानाचा आवाज बुलंद केला होता. रामसिंग, ये हमसे भी आगे कौन खडा है ? जिसकी पिठ हमारे बहाद्दूर शिपाईयोने दसबार देखी है, ओ हमसे आगे खडे है ? असा दमदार सवाल करत औरगजेबाची दत्तकुमार खिल्लत ठोकरली होती. खडागळे ज्या दरबारात मान वर वज्रधारी करून बोलण्याची प्रथा नव्हती ९५६१५५१००६ त्याच दरबारात सह्याद्रीच्या या वाघाने ताठ मानेने आणि ताठ कण्याने दिल्लीच्या सत्तेला आव्हान दिले होते. दिल्ली दरबाराचा थरकाप उडवणारी डरकाळी फोडली होती. मग्रुर सत्तेसमोर स्वाभिमानाचा आवाज बुलंद केला होता. दिल्लीच्या मस्तवाल, घमेंडी आणि गर्विष्ट औरंगजेबी दरबाराचा नुर उतरवला होता. संजय राऊतांच्या राज्यसभेतील भाषणाने साडे तीनशे वर्षापूर्वीचा हा सगळा प्रसंग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. या निमित्ताने महाराष्ट्राच्या मातीतली रग, धग पुन्हा अनुभवता आली. संजय राऊतांचा मनोमन अभिमान वाटला. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात या गर्विष्टांना लोळवले होते, आस्मान दाखवले होतेच पण राज्यसभेत जो आवाज केला तो खूपच ताकदवर होता. तो आवाज भाजपच्या दुटप्पी चेहऱ्याची लक्तरे काढणारा होता. त्यामुळे आपसुकच, 'शाब्बास संजय राऊत शाब्बास!' असे कौतुकाचे शब्द मनाच्या गाभाऱ्यातून अलगद ओठावर आले. 


मी काहीही करू शकतो, कुठलीही सत्ता पाडू शकतो, कुणाचेही आमदार फोडू शकतो, कुणाचेही खासदार फोडू शकतो, माझे कोण काय वाकडे करणार? या भ्रमात व मस्तीत असणाऱ्या अमित शहांची त्यांनी कपडे काढली. अक्षरशः त्यांचे वाभाडे काढले. ही भारताची संसद आहे पाकिस्तानची नव्हे ! असे सुनावत तुमच्यात दम आहे तर पाकिस्तान नष्ट करा ! असे खुले आव्हानच त्यांनी शहा व मोदींना दिले. आम्हाला कुणाच्या देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. शहा-मोदी ज्या शाळेचे विद्यार्थी आहेत त्या शाळेचे आम्ही हेडमास्टर आहोत ! असे ज्या ताकदीने ठणकावून सांगितले ते जबरदस्त होते. संजय राऊत ज्या वेळी बोलत होते तेव्हा अमित शहा समोरच होते.


संजय राऊत त्यांच्याकडे हात करून बोलत होते. यावेळी अमित शहांचे थोबाड बघण्यासारखे झाले होते. मोदी आणि शहांची देशभरात एक सुप्त भिती आहे. ही जोडगोळी आणि त्यांच्या सत्तेविरूध्द बोलण्याची कुणी हिम्मत करत नाही. राजकीय क्षेत्रातल्या, उद्योग व साहित्य क्षेत्रातल्या बहुतेक मात्तबरांनी शेपट्या घातल्या आहेत. पत्रकारितेतल्या तर बहूतेकांनी त्यांच्या आहेत. पत्रकारितेतल्या तर बहूतेकांनी त्यांच्या दरबारी लाचारीच पत्करली आहे. काही दिवसापूर्वी उद्योगपती राहूल बजाज यांनी अमित शहांच्या समोरच 'तुमच्या सरकारची लोकांच्यात भिती आहे' असे सांगितले होते. या जोडीच्या घमेंडी राजकारणाची लक्तरे काढण्याची हिम्मत देशाच्या राजकारणात राज ठाकरे वगळता कुणी केली नव्हती. ममता बँनर्जी किंवा राहल गांधी वगळता फारसं कुणी या बाबत बोलत नव्हते. संजय राऊतांनी नागरिकता विधेयकावर बोलताना राज्यसभेत जबरदस्त टोलेबाजी केली. त्यांची हिम्मत नक्कीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद होती. शिवरायांची याद देणारी होती.