ठाणे : पावसाळा आणि लागूनच आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मुंब्रा विभागात अनधिकृत बांधकामांचा महापूर' आला आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांच्या कालावधीत मजल्यांवर मजले चढले आहेत. तीन-चार-पाच-सहा-सात...मजल्यांच्या शेकडो इमारती गेल्या चार ते पाच महिन्यात बिनधोकपणे उभा राहिल्या आहेत. अनेक जुन्या इमारतींवर क्षमतेचा विचार न करता नव्याने मजले चढविण्यात आले आहेत. हा सर्व प्रकार कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांचा ठाणे महापालिकेत गौरव केला जातो त्या सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात सुरु आहे. महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. मात्र सध्या मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अनधिकृत बांधकामांना आलेला 'महापूर' पाहता बांधकाम करणाऱ्यांना महेश आहेर यांचा 'धाक' राहिला नसल्याचे चित्र आहे. वाढती अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी 'महेश' यांनी कडक कारवाईचा आहेर' द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अशी मागणी जोर धरू लागली आहे. ___मंब्रा विभाग अनधिकृत बांधकामांसाठी कुप्रसिद्ध आहे. मात्र, महेश आहेर यांनी सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळल्यापासून अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांच्या नाड्या काही प्रमाणात आवळल्या गेल्या आहेत. अनधिकृत बांधकामाची माहिती मिळताच कारवाई करण्यात महेश आहेर तत्पर आहेत. आपल्या कारकिर्दीत आहेर यांनी अनेक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे. अनधिकृत बांधकामांसदर्भात न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहन आहेर यांनी अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांचे बस्तान वारंवार उद्धस्त केले आहे. अनधिकृत बांधकामाचे कर्दनकाळ ठरल्याने आहेर याना वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांना ठामपा प्रशासन आणि पोलिसांकडून संरक्षण पुरविण्यात आलेले आहे. मात्र, पावसाळा आणि लागुनच आलेल्या आचारसंहितेमुळे आहेर यांच्यासह ठामपाचे अधिकारी आणि कर्मचारी निवडणुकीत व्यस्त होते. त्या संधीचा फायदा उठवित मुंब्रा विभागात अनधिकृत बांधकामांचा ‘महापूर' आला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी मुंब्रा विभागातील दत्तुवाडी, दाभोळकर बॉम्बे कॉलनी रोड, चांदनगर, सोनाईनगर, 'मित्तल ग्राउंड,' कादर पॅलेस, नाईक चाळ, चरणी पाडा आदीसह अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. तीन-चारपाच-सहा-सात...मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. आजही बांधकामे सुरु आहेत. उभ्या असणाऱ्या इमारतींवर अतिरिक्त मजले चढवण्याची कामेही जोरदार सुरू आहेत. मजले वाढविताना इमारतींच्या बिमच्या क्षमतेचाही विचार केला जात नाही. त्यामुळे इमारती कोसळून मोठ्याप्रमाणावर मनुष्यहानी होण्याच्या दुर्घटना घडत आहेत. अशा पद्धतीमुळेच लकी कंपाऊंड सारखी दुर्घटना होते. बांधकामे उभारताना कोणत्याही प्रकारचे तारतम्य बांधकाम व्यावसायिकाकडून पाळले जात नाही. केवळ इमारत उभारणे आणि त्याची विक्री करून लाखो रुपये कमविणे एवढाच उद्देश बांधकाम व्यावसायीकांसमोर असतो. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांना काहीही घेणेदेणे नसते. अनधिकृत बांधकामांसाठी लागणारे साहित्य रस्त्यांवरच टाकले जात असल्याने स्थानिक नागरिकांना मार्गक्रमण करणे फारच अडचणीचे होत आहे. दचाकी घेऊन किंवा अन्य वाहने घेऊन जाण्यासाठी रहदारीस अडथळा होतो. याबाबत कोणी स्थानिकाने तक्रार केल्यास त्यांना बांधकाम व्यावसायिक धमकावतात. परिणामी स्थानिक रहिवासी मुकाट्याने त्रास सहन करतात. एकूणच मुंब्रा परिसरातील अनधिकृत बांधकामांची सध्याची स्थिती पाहता बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महापालिका प्रशासनाचे पर्यायाने मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या कारवाईचे भय राहिले नसल्याचे दिसते. मुंब्रा प्रभागातील वाढत्या बांधकामामुळे महेश आहेर यांच्या 'कर्तव्यदक्ष अधिकारी' या बिरुदाला गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या मनात ठामपा प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे 'महेश' यांनी अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना कारवाईचा आहेर ‘देऊन' ठामपा प्रशासनाची सर्वसामान्यांमध्ये मलीन होऊ पाहणारी प्रतिमा जपावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ठाणे महापालिका प्रशासन अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी कारवाई करीत असते. तरीही कारवाई करून पथकाची पाठ फिरते न फिरते तोच कारवाई झालेले बांधकाम पुन्हा नव्याने उभा करण्यास सुरुवात होते. कारवाईदरम्यान ठामपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरीही विरोधाला न जुमानता पथक अनधिकृत बांधकामावर कारवाई करत असते. त्यामुळे तोडक कारवाई करण्यात आलेल्या बांधकामाचा आढावा घेण्याचीही मागणी होत आहे.