नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागातर्फे स्वयंसेवी संस्थांना जाहीर आवाहन

नेटवर्कीग कार्यशाळेसाठी नाव नोंदणी करा


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागामार्फत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गरजू गरिब महिला, मुली, मागासवर्गीय घटक, प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, नाका कामगार अशा घटकांकरीता विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. तसेच नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध सामाजिक समस्या सोडविण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्था कार्य करत आहेत. या दोघांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने तसेच नवी मुंबई महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था यांचेमार्फत राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजना व समाजउपयोगी उपक्रम याबाबतची माहिती होणेच्या दृष्टीने व लाभार्थ्यांना सदरील योजना प्रकल्पांचा लाभ देणेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत १६ जानेवारी, २०२० या दिवशी Networking या विषयावरील १ दिवसीय शाळेचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रामध्ये करण्यात येणार आहे. याकरीता नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी आपली नाव नोंदणी समाजविकास विभाग, बेलापूर भवन, १ला मजला, से. ११, सी.बी.डी., बेलापूर या ठिकाणी दि. १०/१/२०२० पर्यंत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.