झाड तोडून रिकाम्या करण्यात आलेल्या जागेचं काय?
ठाणे : वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक आणि त्रासदायक फांद्या छाटण्याची परवानगी दिलेली असताना झाडच मुळासकट उखडून टाकणाऱ्या महाशयांवर वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल झाला असला तरी भलं मोठं झाड तोडून रिकाम्या करण्यात आलेल्या आणि त्याठिकाणी प्लास्टर करण्यात आलेल्या जागेचे काय? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे.
रिकाम्या जागेत झाडांचे पुनर्रोपण केलं जाणार का?
जागा खुली राहून व्यवसायासाठी वापराचा झाड तोडणाऱ्याचा मनसुबा पूर्ण होणार?
ठाणे महापालिका मुख्यालयाच्या पश्चिमेस शंभर मीटर अंतरावर असणाऱ्या राभर माटर अतरावर असणाऱ्या शिवराजनगर सहकारी रहिवाशी संस्थेच्या च्या आवारातील ११ क्रमांकाचे रो-हाऊस सुशील सिंह यांनी राम मूर्ती यांच्याकडून विकत घेतलेले आहे. मात्र पूर्वीचे मालक राम मूर्ती आणि सुशील सिंह यांच्यातील व्यवहाराची रहिवाशी संस्थेला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. शिवाय डीम कन्व्हेन्स झालेला असल्याने आवारातील सर्व प्रॉपर्टी रहिवासी संस्थेच्या मालकीची असताना आणि कोणतीही । पूर्वकल्पना न दता सासायटाचा परवानगी न घता सिंह महाशयांनी रो-हाऊस शेजारी असणारे फणसाचे भलेमोठे झाड मुळासकट उखडून टाकले. याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता ठाणे महापालिकेच्या वक्ष प्राधिकरणने परवानगी दिली असल्याचे सिंह यांनी सांगितले. मात्र रहिवाशी संस्थेच्या परवानगी शिवाय दिलीच कशी आणि परवानगी दिलीच कशी आणि फांद्या छाटण्याची परवानगी दिली असताना सिंह यांनी फणसाचे झाड मुळासकट उखडून टाकलेच कसे? याबाबत रहिवाशी संस्थेच्या सिंह पदाधिकाऱ्यांनी वृक्ष प्राधिकरणकडे विचारणा को करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली, मात्र गुन्हा दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई केली. याबाबत विचारणा करणाऱ्या रहिवाशी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना 'तुमच्यावरच गुन्हा दाखल करतो' असे धमकावून अकलेच्या 'दिवट्या' पेटवण्याचाही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रयत्न झाला.
या प्रकाराबाबत त्रस्त रहिवाशी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री टीम'कडे धाव रुपये घेतली. 'मुख्यमंत्री टीम'ने २७ जानेवारीच्या तली अंकात सदर प्रकरणी 'आपल्या स्टाईल'ने वृत्त पमिट करता प्रसिद्ध करताच झाड मुळासकट उखडल्याकडे दुर्लक्ष करीत गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची पानगळती सुरु झाली. 'मुख्यमंत्री'मध्ये आलेल्या वृत्ताची दखल घेत वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्या अंकिता जामदार यांनी वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 'मुख्यमंत्री'मधील सडेतोड बातमीमुळे पानगळती लागलेल्या वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी अखेर सिंह यांच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संरक्षण अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. ज्या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यानुसार गुन्हा सिद्ध झाल्यास एक ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची किंवा एक आठवडा ते एक वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. सदर झाड उखडून टाकल्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी चर्चेतील माहितीनुसार तब्बल दोन लाख रुपयांची तोड करणारे गुन्हा प्रभावहीन करण्यासाठी आणखी काही लाख रुपये खर्च करणार नाहीत का? मुळातच या गुन्ह्यावर कारवाईची प्रभावीपणे अंमलबजावणी होणार का? हा प्रश्न आहे. गुन्हा दाखल झाला असला तरी तो सिद्ध करण्यासाठी ठामपाच्या वृक्ष प्राधिकरणचे अधिकारी कितपत प्रामाणिकपणे प्रयत्न करतील हाही प्रश्नच आहे.
सुशील सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी ज्या जागेतून फणसाचे झाड मुळासकट उखडून टाकण्यात आले त्या जागेचं काय? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीत आहे. सिंह यांचा दुचाकी विक्रीचा व्यवसाय आहे. सदर जागा विक्रीसाठीच्या दुचाकी ठेवण्यासाठी ते वापरणार असल्याची माहिती आहे. सिंह यांनी फणसाचे झाड मुळासकट उखडून टाकले त्या जागेत प्लास्टर करीत धातूचे शेड उभारले होते. सध्य स्थितीत धातूचे शेड रहिवासी संस्थेच्या आक्षेपावरून काढून टाकण्यात आलेले असले तरी झाड तोडून रिकाम्या करण्यात आलेल्या जागेबाबतचा काय? हे अनुत्तरीत आहे. त्याबाबतचा त्वरित निर्णय न झाल्यास किंवा त्या जागेत वृक्षांचे पुनर्रोपण न झाल्यास ज्या उद्देशासाठी सिंह यांनी झाड तोडले तो सध्या होण्यासाठी मदतच होणार आहे. सिंह हे आमच्या संस्थेचे सभासद नाहीत. त्यामुळे आम्ही सदर प्रकारात सिंह यांच्याशी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करीत नाही. रो हाऊसचे पूर्वीचे मालक राम मूर्ती यांनाच नोटीस पाठविली असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.