डिसेंबर महिन्यात मागितलेली माहिती दिली असती तर? ।

ठाण्यात किती मॉल आहेत? त्यांना अग्निशमन विभागाची परवानगी आहे का? त्यांचे अग्निशमन यंत्रणेचे सर्वेक्षण करण्यात आले आहे का? असे प्रश्न उपस्थित करत ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी माहिती अधिकारात दिनांक २२/११/२०१९ रोजी माहिती मागितली होती. त्यांना दिनांक १९/१२/२०१९ रोजीच्या पत्राने बोध होत नाही, माहितीचे प्रयोजन स्पष्ट नाही, जनहितार्थशी संबंधित कसे, त्रयस्थ पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहचेल असे उत्तर देत माहिती अधिकार निकाली काढण्यात आला. जर ही माहिती दिली असती किंवा माहिती देण्यापूर्वी ठाण्यातील सर्व मॉलच्या अग्निशमन यंत्रणेचे सर्वेक्षण करण्यात आले असते तर ही दुर्घटना घडलीही नसती. मात्र अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांना नागरिकांच्या जीवितापेक्षा मॉल मालकांच्या भविष्याची आणि त्यातून मिळणाऱ्या मलीद्याशी जास्त सोयरिक चांगली वाटते असेच म्हणावे लागेल.