राजकारणात महिलांनी जास्त शिरू नये. देवेन्द्रजी आहेतच ना, मग अर्धांगिनीचे काय काम ? असा सवाल आहे. राजकारणात आरोप प्रत्यारोप सुरूच असतात, मात्र मुख्यमंत्री पदावर कार्य केलेल्या अनुभवी माणसाने केवळ राजकारणाने प्रेरित होऊन आरोप करणे चुकीचे आहे. अन्य आमदारांचे किंवा आरोप करण्यासाठी ठेवलेल्या पोपटांचे ठीक आहे. महाराष्ट्रात नव्या समीकरणांची सत्ता आली. ती का आली याचे आत्मचिंतन आणि आत्मक्लेश करण्याऐवजी ऐवजी बेछूट आरोप करणे कितपत योग्य आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. कारण देवेंद्र फडणवीसही मुख्यमंत्री होते. आज महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे आणि मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारही होतोय. त्यामुळे पुन्हा सत्ता पाच वर्ष मिळेल ही अपेक्षाच आता धूसर झालेली आहे. पण राजकारणात काहीही होऊ शकते हेही विसरून चालणार नाही.आज देश जाळतो आहे. कशामुळे? याचे उत्तर नरेंद्र मोदींनी देशाला आणि मतदारांना देणे गरजेचे आहे. त्याचे लोन आणि ती आग महाराष्ट्रातही पोहचलेली आहे. तेव्हा देवेंद्र यांनी ज्याला सर्व थरातून विरोध होत असताना महाराष्ट्रात समर्थनार्थ मोर्चा काढून सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? असा संतापलेल्या अवस्थेत सवाल करणे कितपत योग्य आहे. आज देशात बेरोजगारी, बेकारी, वाढती महागाई, पडलेला रुपया, जागतिक स्तरावर झालेली पीछेहाट अशा विविध समस्या आणि प्रश्न समोर असताना नागरिकत्व संशोधन कायद्याने काय साध्य होणार आहे. एवढे मात्र निश्चितच साध्य होईल की लोक वास्तवापासून भरकटतील आणि भरकटले आहेत. जर भरकटले नसते तर नागरिकत्व संशोधन कायद्याला मंजुरी मिळाली नसती. नाही भरकटले तर देशातील आम्ही विशेषतः महाराष्टातील अस्थिर परिस्थितीचा विशेषतः महाराष्टातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेता येईल. मात्र जनता विरोधासोबतच देशाच्या परिस्थिती आणि सद्यस्थितीचा अभ्यास करीत असल्याने केंद्रात बसलेले नरेंद्र मोदी हेच अस्वस्थ आहेत. पाचवर्ष केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र असे समीकरण होते. पण निवडणुकांनंतर अतिशहाणपणा शेणात गेला
अशी अवस्था झाल्याने केंद्रात नरेंद्र राहिले पण महाराष्ट्रात मात्र उद्धव आले. ठाकरेशाहीचा पहिला मुख्यमंत्री ठरला. यासर्व गोष्टींमुळे हातची सत्ता गेल्याने चुकीने पत्ता टेकवून गेम हरलेल्या जुगाऱ्यासारखी अवस्था देवेंद्र फडणवीसांची झालेली आहे. त्यामुळेच बेछूट आरोप करत सुटले आहेत. निवडणुकीकाळात सेनेने हीच ती वेळ... हे प्रत्यक्षात करून दाखविले यात शंका नाही. पण त्या ५ वर्ष सत्ता भोगणाऱ्या किंवा चालविणाऱ्या माजी मुख्यमंत्री फडणवीस याना आज विचारावेसे वाटते कि, कुठे? नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र तर त्याचे कदाचित उत्तर त्यांच्याकडे नसेल, पण असे होणारच नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही प्रश्नांचे उत्तर फडणवीस यांच्याकडे नाही असे होऊ शकत नाही. उत्तर आहे पण ते दुसऱ्या पद्धतीचे आहे. महाराष्ट्रावर भाजपने पाच वर्षे राज्य केले नसते. ९५३ भाजपचे सरकार आले नसते तर महाराष्ट्राने कधीच उत्कर्ष केला नसता अशा अंतर्भावात अनेक भाजप नेते धांदात खोटे बोलतात. थोडक्यात तो मी नव्हेच हे ठासून अगदी मी पुन्हा येईन.....मी पुन्हा येईन प्रमाणे मुख्यमंत्र्यांचे पोपट प्रचार करीत आहेत. महाराष्ट्रावर सत्ता महाविकास आघाडीची येऊन पाच महिने अजून व्हायचे आहेत. तर लगेच १० रुपयांमध्ये जेवणाची थाळी हे उवाच असल्याचे सांगत आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पोपट सहकारी कांगावा करीत आहेत. मागच्या पाच वर्षांत सत्तेवर तुम्ही होते तेव्हा तुम्हाला का शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करता आला का शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करता आला नाही? त्यामागचे कारण काय? याचे उत्तर प्रथम फडणवीस यांनी द्यावे आणि त्यांच्या विटूविटू पोपटानेही उत्तर द्यावे. तुम्ही पाच वर्षांत जे काही केले त्याला सावरण्यासाठी किमान वर्षभर तरीही द्याल की नाही. पण भाजपची भूमिका हि नेहमीच अशी ठरली आहे. आपला तो बाबू, अन लोकाच कार्ट यापेक्षा दुसरे काहीही नाही. देवेंद्र तुम्ही महाराष्ट्रावर आणि नरेंद्र तुम्ही देशावर पाच वर्ष काम केले. देशाचा विकास केला कि भकास केले याचे प्रथम उत्तर द्यावे. दिलेला शब्द्ध तुम्ही पाळला नाही, मग दुसऱ्याला विचारणा करणे कितपत योग्य आहे.
पाच वर्षात तुम्हाला काहीचजमले नाही. मात्र सत्ता हातात मिळून सत्ता चालविणाऱ्या टीमची निवडही झालेली नसताना १० रुपयात जेवणाची थाळी हे फेक असल्याचा दावा भाजपच्या पोपटांनी करावा का? तुम्ही राम निश्चित नाही, तुमचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ समजायला. तुम्हाला शिखंडीही म्हणता येणार नाही. नाहीतर शिखंडीचा अपमान होईल. सरकारी कर्मचारी यांचा पैसा हा खाजगी बँकांमध्ये ठेवण्याचा निर्णय हा तुमच्या हितासाठी आणि तुमच्या धर्मपत्नीच्या हितासाठी होता.
महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या हिताचा नव्हता. ही बाब समोर आली म्हणून अन्यथा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रातील जनतेच्या निदर्शनास आलेल्या नाहीत. याचाच अर्थ आम्ही शिवसेना किंवा महाविकास आघाडीचे समर्थन करतो असे नाही. आम्ही भाजपचेही समर्थन केले. पण पाच वर्ष तुम्ही जे काही केले. त्यानंतर तुम्ही समर्थनाचे हक्कदार राहिलेच नाही. आता महाविकास आघाडी आहे. त्यांना प्रथम पाच वर्ष काम तर करू द्या, मग त्यांचे समर्थन करायचे की लाथा घालायच्या हे ठरवता येईल. पण काम करण्यापूर्वीच बेताल आरोप करून आम्ही राजकीय नेत्यांच्या पोपटपंची पंक्तीला बसू शकत नाही. मोदी लाटेत खऱ्या अर्थाने या देशातील जनतेने तुम्हाला देशाच्या गादीवर बसवले. तुमचा जाहीरनामा काढा आणि त्यापैकी कुठली कामे अर्धी म्हणा किंवा पूर्ण केली ते मोदी साहेबांच्या मन कि बातमध्ये येऊ द्या, किती रोजगार निर्माण केले, त्यासाठी किती उदयग भारतात आणले, किती कंपन्यांचे पुनर्जीवित केल्या, महागाई वाढली का?, अशा विविध आश्वासनांचे काय झाले ते सांगा , पाच वर्ष तुम्ही मोदीसाहेब प्रसारमाध्यमांशी बोलले नाही. तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केला, छाती ५६ इंचाची झाली, पण देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाचे समस्यांचे काय ? यावर आता तरी बोला, सांगा, अन विरोधकांना लाथा घाला. पण सांगणार काय अन बोलणार काय? म्हणूनच दिल्लीत नरेंद्र मोदी अस्वस्थ आहेत. त्यात अमितशहा यांनी नवी झंझटी आणल्या. देश पेटला. त्यामुळे मोदीजी अस्वस्थ आहेत. पण महाराष्ट्रात देवेंद्र मात्र आपल्या हेकेखोर प्रवृत्तींनी बेजार आहेत आणि आक्रमक झालेत. देवेंद्रजी तुम्ही आक्रमक व्हा, कारण विरोधी पक्षनेते आहात. पण सत्ताधाऱ्याना प्रथम काम तर करू द्या. चुकले तर सोडू नका, पण प्रथम चूक तर होऊ द्या. कारण सत्तेवर राजकीय नेता बसलेला नाही. तर सत्तेवर सामाजिक नेता बसला आहे. तेव्हा उद्धव ठाकरे हे काय करतील याचा नेम नाही. म्हणूनच आक्रमक व्हा पण जरा जपून ..!