मुंबई : झोन-३ चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी यशवंत शिंदे यांना केलेल्या मारहाण प्रकरणात १० तारखेपर्यंत अहवाल येईल आणि आदेश निघतील, असे आश्वासन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी आरटीआय कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळास दिले. ___ केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी, पद्मश्री सुचेता दलाल, अनिल गलगली, भास्कर प्रभू, जीआर वोरा, डॉल्फि डिसोझा आणि तक्रारदार यशवंत शिंदे यांनी पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. यावेळी सह पोलीस आयुक्त संतोष रस्तोगी उपस्थित होते. बर्वे यांनी आश्वस्त केले की, चौकशी सुरु असून १० तारखेपर्यंत आदेश जारी होतील. सीसीटीव्ही फुटेज दालनात नसल्याने ते देण्याचा प्रश्न उदभवत नाही पण बाहेरील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करण्यात येईल.
यशवंत शिंदे मारहाण प्रकरण १० तारखेपर्यंत अहवाल येईल- पोलीस आयुक्त
• मुख्यमंत्री