महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला फायदा होणार
ती घोषणा होती मुख्यमंत्री कार्यालयाच्या कारभाराबाबत. सध्या बारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री कार्यालयात असणाऱ्या कामासाठी मुंबईला येण्याशिवाय पर्याय नसतो. नागरिकांना त्यांच्या अनेक प्रलंबित प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अपेक्षित असते. त्यासाठी या मायानगरीत यावं लागतं. इथे त्यांच्या राहायची व्यवस्था देखील नसते. कुणा पाहण्याकडे त्यांना राहावं लागतं. अख्खा ग्रामीण महाराष्ट्र त्यांच्या शासकीय कामांसाठी मंत्रालयात धाव घेत असतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा ही लोकाभिमुख आहे. लोकांचे हीत पाहणारी आहे. जर त्या योजनेची अंमलबजावणी झाली तर याचा लाभ महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला त्यांच्या त्यांच्या भागात होणार आहे. खरंच कौतुकास्पद आहे प्रत्येक महसूल विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही घोषणा. राज्य सरकारने याची अंमलबजावणी तातडीने करायला हवी आणि महाराष्ट्रात जे प्रमुख महसूल विभाग आहेत त्या त्या भागात मुख्यमंत्री कार्यालय म्हणजेच सीएम ऑफिसचा कारभार सुरू करायला हवा. जनताभिमुख लोकशाही हीच आहे. महत्वाच्या व्यक्तीच्या जनतेची जीतका जवळचा संबंध तितकी लोकशाही अधिक मजबूत होत असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनामध्ये केलेल्या घोषणेचे एक जबाबदार प्रसिद्धी माध्यम म्हणून आम्ही कौतुक करतो. जास्तीत जास्त लोकांना मुख्यमंत्री कार्यालयाचा संपर्क व्हावा व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी या कार्यालयामार्फत मदत मिळावी ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देतो.