नियमित बदल्या का करण्यात आल्या नाहीत?

महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार दर ३ वर्षांनी अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या होणे नियमांनुसार क्रमप्राप्त असताना असे होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक अधिकारी / कर्मचारी यांची पालिका प्रशासनावर मोठी पकड निर्माण झाली आहे. आयुक्तांनी जर नियमांनुसार वेळोवेळी अधिकाच्या बदल्या केल्या असत्या तर आज ही नामुष्कीची वेळ आली नसती.