मान्यता नसलेला मुरव्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे

ठाणे महानगरपालिकेने शशिकांत काळे यांना प्रतिनियुक्तीवर दिनांक ६ जून २०१६ रोजी रूजू करून घेतल्यानंतर कार्योत्तर मंजुरीसाठी दिनांक २० डिसेंबर २०१६ रोजीच्या महासभेमध्ये ठराव आणून मंजूर करून घेण्यात आला. सदर ठरावामध्ये शशिकांत काळे मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी दिनांक १८/११/२०१६ रोजीच्या अर्जावर दिनांक ६ जून २०१६ पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने मुख्य अग्निशमन अधिकारी, अग्निशमन विभाग या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्यांनी दिनांक ६ जून २०१६ पासून एकूण तीन वर्षांकरिता नियुक्तीचा कालावधी वाढवून मिळणेबाबत विनंती केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण स्वियेत्तर सेवा नियम १९८१ मधील नियम ४० परिशिष्ट ३ वरील अट क्रमांक २ नुसार ज्या पदाच्या बाबतीत अधिक कालावधी विहित केलेला असेल अशी पदे खेरीज करून इतर सर्व बाबतीत प्रतिनियुक्तीच्या कालावधीची कमाल मर्यादा तीन वर्षे इतकी राहील. ___तसेच शशिकांत काळे यांच्या प्रतिनियुक्तीने केलेल्या नियुक्तीत महासभेची आवश्यकता असल्याने त्यांच्या दिनांक ६ जून २०१६ पासून ते दिनांक ५ जून २०१७ या एक वर्षाचा कालावधीस कार्योत्तर मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव मा. महासभेपुढे सादर करण्यास व दिनांक ६ जून २०१७ ते दिनांक ५ जून २०१९ पर्यंत म्हणजेच दोन वर्षाचा काळ नियुक्तीचा कालावधी वाढवून मिळण्यासाठी ही सर्वसाधारण सभा मान्यता देत आहे. असा उल्लेख करत ठराव मंजूर करण्यात आला. शशिकांत काळे यांची मुदत ५ जून २०१९ पर्यंत होती तर त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या मुदतवाढीचा किंवा परत पाठवण्याचा प्रस्ताव का तयार केला नाही? किंवा त्याठिकाणी नव्याने अधिकारी नियुक्त करण्याची प्रक्रिया का पूर्ण करण्यात आलेली नाही? हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. .लेखा विभाग पगार कसा देऊ शकतात ज्या अधिकाऱ्याचा प्रतिनियुक्तीवरील कालावधी संपलेला आहे अशा व्यक्तीला जोपर्यंत मुदतवाढ देण्यात येत नाही तोपर्यंत लेखा विभागाने पगार काढणे चुकीचे आहे, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. लोकप्रतिनिधी अनभिज्ञ शशिकांत काळे यांच्या प्रतिनियुक्ती संदर्भात तसेच त्यांच्या मुदतवाढीच्या अनुषंगाने आम्ही काही लोकप्रतिनिधींनी बरोबर चर्चा केली त्यावेळेस पालिका प्रशासनाने मुद्दतवाढी संदर्भात कोणताही ठराव महासभेपुढे मान्यतेसाठी आणला नसल्याचे स्पष्ट करत याबाबत प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे सांगितले. ठाण्यातील अनधिकृत हॉटेलवर वरदहस्त कमला मिल दुर्घटनेनंतर अग्निशमन विभागाने ठाण्यातील सर्व हॉटेलांना नोटिसी काढत कारवाई करत असल्याचे दाखविले. मात्र आजपर्यंत कोणत्याही हॉटेलवर कारवाई करण्यात आलेली नाही. यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल झाली असल्याचे चर्चिले जात आहे. मात्र यामुळे ज्याप्रकारे कमला मिल दुर्घटना घडली तशी एखादी दुर्घटना दुर्दैवाने ठाण्यात घडली तर याला जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.