पर्यावरण मत्री आदित्य ठाकरे यांना आव्हान

 या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असणारी ठाणे महापालिकेतील वृक्षप्राधीकरण विभाग पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना आव्हान ठरू पाहत आहे. शहरीकरणाच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या हद्दीत नियम पायदळी तुडवून सर्रास पर्यावरणाचा -हास सुरु आहे. नियम धाब्यावर बसवून अर्थपूर्ण व्यवहार करीत शेकडो वृक्षांच्या कत्तलीवर कत्तली केल्या जात आहेत. कोणी तक्रार केलीच तर एक तर तक्रारदाराला धमकावले जाते किंवा कारवाईच गुंडाळण्यात येते. सत्ता शिवसेनेचीच असल्याने आपल्यावर कोणतीच कारवाई होऊ शकणार नसल्याचा आत्मविश्वास'च सर्व अधिकाऱ्यांना आहे. मग अशा परिस्थितीत काय करावे? हा पर्यावरण प्रेमींपुढील गहण प्रश्न आहे. सदर प्रकरणी आदित्य ठाकरे यांनीच लक्ष घालण्याची मागणी होत आहे.