ठाणे महापालिकेकडून अहवाल देण्यास टाळाटाळ

५ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांना सूचना देण्यात येतात की, भुयारी गटार योजनेचे काम करताना गौण खनिजांच्या वापराची रॉयल्टीची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांना दिनांक १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत उपलब्ध करून द्यावी. जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांनी माहिती प्राप्त झाल्यावर नियमानुसार आदेश पारित करून वसुली असल्यास वसुलीबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी. आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांनी शासनाच्या ०४/१२/२०१२ च्या परिपत्रकात दिलेल्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करावी असे नमूद केले आहे. त्यानंतर ०४/१२/२०१९रोजी घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये पुन्हा नव्याने पालिका प्रशासनाला सूचना देत गौण खनिजांच्या वापराचा रॉयल्टीची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दोन आठवड्यात सादर करावी, असे आदेश देण्यात आले होते. मात्र सदर अहवाल आजपर्यंत पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेला नाही.