'महाराष्ट्रातील संत परंपरा' वी नीड यू सोसायटीच्या वतीने वैचारिक शिबिराचे आयोजन

ठाणे: वी नीड यू सोसायटीच्या वतीने २२ ते २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान महाराष्ट्रातील संतपरंपरा' वैचारिक शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषदेजवळ, सुभाष रोड, ठाणे (प) येथे पार पडणाऱ्या सदर शिबिरात डॉ.सदानंद मोरे, अँड.देवदत्त परुळेकर आणि सचिन परब मार्गदर्शन करणार आहेत. शिबिर शुल्क प्रत्येकी रु.३०० असून दोन्ही दिवसांचा चहा, नाष्टा, वर्किंग लंच समाविष्ट आहे. शिबिराकरता नावनोंदणी करणे आवश्यक असून इच्छुकांनी विहा पोळ - ९१५२०३१३२१ व संजीव साने ९८६९७८९७०५ यांच्याशी संपर्क करावा. महाराष्ट्राला समृद्ध अशी संतसाहित्याची आणि संतजीवनदृष्टींची परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणाला या संत परंपरेने ढवळून काढल्याचे दाखले इतिहासात जागोजागी आढळतात. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळींची आणि नवसाहित्याची नाळही संतपरंपरेशी जोडली गेल्याचे दिसते. आजच्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या पलीकडे जाणाऱ्या संतपरंपरेची ज्योत तेवती ठेवण्याच्या उद्देशाने संतपरंपरा नव्याने समजून घेणे आवश्यक आहे. याकरता एका शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी मराठी साहित्यक्षेत्रातील, सामाजिक वर्तुळातील आणि पत्रकारीतेतील व्यासंगी, मान्यवर असे तीन वक्ते लाभले आहेत. इच्छुकांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.मकरंद घारपुरे, जयंत कुलकर्णी, अतुल गोरे, श्यामल सोमण यांनी केले आहे.