मुंबई : गृहनिर्माण उद्योगाला उभारी देण्याची गरज आहे. पुनर्विकासाचा सर्वात मोठा स्त्रोत म्हाडा आहे. झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करताना मूळ मालकालाच घरे मिळाली पाहिजेत. म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत लोकसंख्येनुसार प्रसाधनगृहांची संख्याही वाढवावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले यांनी दिले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील ज्या घरात वास्तव्य होते त्या संपूर्ण इमारतीचा विकास म्हाडाने करावा, असेही आव्हाड यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गृहनिर्माण विभागाच्या कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी गृहनिर्माण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याची गरज यावेळी व्यक्त केली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी रखडलेल्या योजनांना गती देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. गोरेगाव सिद्धार्थनगर पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात म्हाडानेउर्वरित काम तत्काळ पूर्ण करावे व रहिवाशांचे थकलेले भाडे द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. परिवहन व संसदीय कार्य मंत्रीअनिल परब, पर्यटन, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्यठाकरे, माजी केंद्रीय मंत्री खा.अरविंद सावंत, माजी मंत्री रवींद्र वायकर, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. __यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार यांच्यासह म्हाडा, एसआरएमहारेरा, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प,धारावी पुनर्वसन प्रकल्प, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.