डीएनए बंद झाल्याने विक्रेत्यांचे लाखो रुपये थकित थकित रक्कम देण्यास दिरंगाई

ठाणे : झी समूहाचे डीएनए वृत्तपत्र बंद होऊन तीन महिने उलटले तरी येणे बाकी न मिळाल्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पैसे त्वरित नाही मिळाले तर झी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी वृत्तपत्र विक्रेत्यांनी सुरु केली आहे. डीएनए वृत्तपत्र बंद जाऊन तीन महिने उलटून गेले आहेत. मात्र, कुंपणच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांचे लाखो रुपये येणे बाकी आहे. तीन महिन्यापासून विक्रेत्यांचे पैसे मिळत नाही यावर अंबिका एजन्सीच्या विनंतीला मान देऊन सर्व संघटनांनी झी समूहाच्या कार्यालयात बैठक घेतली. झी समूहाने नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पैसे देतो असे सांगितले होते. परंतु आजपर्यंत पैसे मिळालेले नाहीत. मराठी विक्रेत्यांनी रोखीने पेपर घेऊन सुद्धा कपनचे पैसे आजतागायत मिळत नाहीत. जर लवकरात लवकर पैसे मिळाले नाहीत तर विक्रेते झीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा तयारीत आहेत.



ठाण्यातील हनुमान मंदीराजवळ, गोखले रोडवरील धोकादायक दुभाजक हा अपघात होण्यास कारणीभूत ठरत आहे. रात्री, पहाटेच्या सुमारास हा दुभाजक चालकास समजून येत नसल्याने कित्येक वेळा वाहने या दुभाजकास धडकतात व वाहन चालकाच्या लक्षात येईपर्यंत वाहनाचा तोल जाऊन अपघात होत असतात. अजूनपर्यंत मोठे नुकसान न झाल्यामुळे कोणीही त्याची दखल घेतली नाही. पण भविष्यात कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ नये म्हणून संबंधित अधिकार्यांनी या धोक्यापासून मुक्तता करावी.