अग्निशमन परवाना दर्शनी भागी लावणे आवश्यक

अग्निशमन विभागाने दिलेला परवाना प्रत्येक ठिकाणी दर्शनी भागात लावणे आवश्यक असताना तसे कुठेही करण्यात येत नाही. पालिका प्रशासनाने परवाना दर्शनी भागात लावण्याची सक्ती केल्यास नागरिकांना सदर मॉलने सर्वेक्षण केले आहे किंवा नाही हे प्रवेश करतानाच समजेल. त्यामुळे नागरिकही सजग होतील आणि ज्याठिकाणी सर्वेक्षण केले नसेल त्या ठिकाणी जाणे टाळतील.