शहर विकास विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी गेली अनेक वर्ष ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्या बदल्या करणे नियमांनुसार गरजेचं असतानाही त्या करण्यात येत नाहीत. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. शहर विकास विभागात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. त्यातही टिडिआर घोटाळ्याचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात आहे. या विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी विकासक व वास्तू विशारद यांच्याबरोबर संगनमताने अनेक घोटाळे केले आहेत. या संदर्भात वत्तपत्रात बातम्या आलेल्या आहेत. अनेक नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र या सर्व प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. विद्यमान महापौर नरेश मस्के यांनी म्हाडा संदर्भातील मोठा टिडीआर घोटाळा उघड केला होता. त्यांनी महासभेत टिडीआर संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते त्याचीही उत्तरे प्रशासनाने दिली नाहीत. कालच्या महासभेत राष्ट्रवादी गटनेते नजीब मुल्ला यांनी एका विकासकाला कशा प्रकारे नियमबाह्य पद्धतीने टिडीआर देण्यात आला याचे पुरावेच दिले. गेल्या ५ वर्षात त्यांनी शहर विकास विभागातील अनियमिततेबद्दल कोणत्याही अधिकाऱ्यांवर कारवाई केली तर नाहीच मात्र कोणाचीही साधी बदलीही केली नाही. शैलेश बेंडाळे, देवेंद्र नेरमहेश रावळ, संगीता नाईक, नितिन येसुगडे, रूपेश पाडगावकर असे अनेक श पाडगावकर असे अनेक कर्मचारी/अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. यांची बदली गरजेचे आहे.
शहर विकास विभाग आणि घोटाळे!
• मुख्यमंत्री