ठाणे महापालिकेची उलाढाल सध्या तीन हजार कोटींच्या पुढे आहे. या सर्व कारभारात सुसूत्रता ठेवण्यासाठी पूर्ण वेळ सचिव असणे आवश्यक असताना गेली अनेक वर्ष प्रभारी सचिव कार्यान्वित आहेत. ज्यांच्याकडे सचिव विभागाचा कार्यभार आहे त्यांच्याकडे इतरही विभागांचे काम आहे. या विभागात मोठ्या प्रमाणात अनागोंदी असल्याचे आम्ही यापूर्वी उघडकीस आणलेले आहेच. अनेक नगरसेवकांनी सचिव विभाग योग्य काम करत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. मग आयुक्तांनी त्याचवेळी बदली का नाही केली? थर्ड पार्टी ऑडिट आल्यानंतर त्यात चुका असल्याचा त्यांना आता कळत असेल तर ते कितपत योग्य आहे. किमान आता तरी पूर्ण वेळ सचिव नियुक्त करणे आवश्यक आहे.
पूर्णवेळ सचिव कधी नियुक्त करणार?
• मुख्यमंत्री