चला, आता सरकार जनतेला दिसू दे...

३० डिसेंबर २०१९ रोजी या सरकारचा विस्तार झाला आणि ४३ मंत्र्यांचे सरकार परिपूर्ण झाले. विस्तार झाल्यानंतर त्याच दिवशी मंत्र्याना खाते वाटप होईल असे अपेक्षित होतेपण काँग्रेसमधील कुरकूर आणि राष्ट्रवादीचा हट्ट यातन विलब होत राहिला. खरे तर महाविकास आघाडीची घोषणा करण्यापूर्वीच कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदे व कोणत्या पक्षाला कोणती खाते मिळणार याचा आराखडा ठरला होता. पण जसे दिवस जाऊ लागले तशी घटक पक्षांची हाव वाढू लागली. शिवसेनेत आजही खदखद आहे. पण या पक्षाचे सर्व निर्णय मुंबईत आणि मातोश्रीवरच होत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व निर्णय घेताना शरद पवारांचा शब्द अंतिम असतो. मात्र काँग्रेसच्या प्रादेशिक नेत्यांना जे वाटते ते पक्षाच्या श्रेष्ठींना मंजूर होईलच हे कोणी सांगू शकत नाही. आपल्या पक्षाचे सर्वांत कमी आमदार असले तरी आपल्याशिवाय महाआघाडीचे सरकार स्थापन होऊ शकत नाही व सरकार चाल शकत नाहीअशी खूणगाठ काँग्रेस श्रेष्ठींनी पक्की बांधली आहे. म्हणूनच महाआघाडी सरकारमधे निर्णय घेताना विलंब होतो आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणे हा एक मोठा चमत्कार होता. केवळ शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आणि उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या धाडसामुळेच हे तीन पक्षांचे सरकार स्थापन होऊ शकले. विधानसभा निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून लढवली होती, पण शिवसेना तेव्हा भाजप बरोबर होती. तिनही पक्षांच्या विचारात भिन्नता आहे. तिन्ही पक्षांचा अजेंडा व चिन्ह वेगळे आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तिन्ही पक्षात एकमत होणे जरूरीचे आहे. तिनही पक्ष नकारात्मक भूमिकेतून एकत्र आलेले आहेत. निवडणुकीनंतर झालेली ही आघाडी


आहे. भाजप नको या एका मुद्यावर तिनही पक्षांचे एकमत आहे. निवडणुकीत काँग्रेसचे ४४ व राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले. या दोन्ही पक्षांना विरोधी बाकांवर बसण्याचा जनादेश होता. स्वतः शरद पवार निकालानंतर पंधरा दिवस हेच रोज सांगत होते. शिवसेना जर भाजपबरोबर निमूटपणे फरफटत सेना जर भाजपबरोबर निमूटपणे फरफटत गेली असती तर भाजपने दिलेल्या खात्यांवर व मंत्रीपदावर समाधान मानावे लागले असते. भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदही दिले नसते. आणि २०१४ ते २०१९ या काळातही दिलेले नव्हते. पुढील पाच वर्षात काँग्रेस व राष्ट्रवादी प्रमाणेच शिवसेनेची अवस्थाही राज्यात च शिवसनचा अवस्थाहा राज्यात बिकट झाली असती. शिवसेनेला संकुचित करणे व मित्र पक्ष म्हणून आपल्या मागे फरफटत नेणे हीच भाजपची मानसिकता होती. अडिच वर्षासाठी मुख्यमंत्रीपदाचा दिलेला शब्द भाजपने न पाळल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपचा कावेबाजपण ओळखला व वेळीच भाजपपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. त्याचे फळ त्यांना व शिवसेनेला मिळाले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या तत्वाने महाराष्ट्र विकास आघाडी निर्माण झाली आहे. तिन्ही पक्षांचा राजकीय शत्रू भाजप आहे व येत्या काळात भाजपला पदोपदी रोखणे हे काम या तिनही पक्षांना प्राधान्याने करावे लागणार आहे.


भाजपशी युती केली ही मोठी शिवसेनेने चूक केली, असे लोकसभा निवडणुकीपूर्वी बिकट उद्धव ठाकरे यांनी मुंबईत। झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात म्हटले होते. युतीत आम्ही पंचवीस वर्षे सडलो असे उदगार त्यांनी काढले होते. त्यानंतर सेनेने स्वबळावर लोकसभा विधानसभा निवडणूक लढविण्याचा ठराव कला होता. पण अमित शहा व देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर आले व त्यांनी शिवसेनेशी युती मातोश्रीवर आले व त्याना शिवसेनेशी युती करण्याबाबत आग्रह धरला. आमच ठरलंय असे ठाकरे सतत सांगत होते, विधानसभा निवडणूक निकालानंतर त्याचा इन्कार स्टेटलाइन देवेंद्र फडणवीस यांनी केल्यावर ठाकरे खांडेकर यांनी एकला चलो रे मार्ग अवलंबलाशिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने एकवीस डिसेंबर २०१९ च्या अग्रलेखात म्हटले आहेः देवेंद्र फडणवीस व त्याच्या मायबापांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून त्याच्यावर महाराष्ट्रात राजकाय बकार होण्याची पाळी आली आहे. आता शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून देण्याची घोषणा केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद लावून खिडकात बसलल्याना खिडकाहा बद करून घ्यावी. शिवसेनेने स्पष्ट केले आहे आता आपल्यात कोणतेच नाते उरलेले नाहीनात्यांचेही तसे ओझेच होते, तेही आता उतरले....


भाजपशी युती तोडल्याने शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे नवे मित्र मिळाले. त्र मिळाल. दोघांनी शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्री देऊ केले व सरकार स्थापनेविषयी विश्वास दिला. जे कम्युनिस्ट, सपा, सेनेपासून दूर राहिले तेही शिवसेनेसोबत आले आहेत. शिवसेनेने हिंदुत्व सोडले असे जाहीर केलेले नाही पण धर्मनिरपेक्ष म्हणविणार्या पक्षांबरोबर सरकार स्थापन झाले आहे. अर्थात देशाच्या घटनेतच धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार असल्याने त्यात वावगे काही आहे असे म्हणता येणार नाही. शिवसेनेला केंद्रात मोदी सरकारमध्ये असलेले एकमेव मंत्रीपद गमवावे लागले. पण राज्याचे मुख्यमंत्रीपद सेनेला मिळाले. भाजपला दूर ठेऊन आम्ही शंभर टक्के राजकारण करू शकतो असे शिवसेनेने भाजपला ठणकावून दाखवून दिले.


महाराष्ट्रासारखी मोठ्या राज्याची सत्ता गमावल्यामुळे भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. शिवसेनेसारखा तीस वर्षाचा जुना मित्र भाजपने गमावला आहे. महाराष्ट्रात भाजपला आता रामदास आठवलें, विनायक मेटे किंवा महादेव जानकर शिवाय कोणी मित्र उरलेला नाही. पाच वर्षात भाजपने शिवसेनेला रोखण्याचे काम करताना काँग्रेस- राष्ट्रवादीत मोठी फोडाफोडी करून आपल्या पक्षाचा विस्तार केला. या सर्वांचा वचपा आता महाआघाडीतील तिनही पक्ष काढणार का आणि किती वेळात हे बघायला मिळेल. मुख्यमंत्रीपद शिवसेनेलाउपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला आणि विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला असा सुरूवातीला महाआघाडीत समझोता ठिक झाला. पण नंतर खातेवाटपात तताच्या सना वाटपात काँग्रेस राष्ट्रवादीची खेचाखेची होणार व त्याला उद्धव ठाकरे किती संयमाने तोंड देतील हेही बघायला मोल भिलपोते की सरला की नाही त्याची कसर सेनेला भरून काढावी लागेलशंकर गडाख, बच्चु कडू , राजेंद्र येड्रावकर यासारख्या मित्रांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपदे द्यावी लागली. जे शिवसेनेत नाराज झाले त्यातले बरेच निष्ठावान आहेत. त्यांचेही भविष्यात समाधान करावे लागेल.


सरकार स्थापनेच्या काळातही शेतकरी आमहत्या खप झाल्या. शेतकर्यां ना कर्जमाफी ते कर्जमनी ही प्रकिया विशेष यंत्रणेकदन वा लागेल यावा म नोववादी लागेल ना जानेवारी सरनोपानी दहा रूपयात शिवभोजन थाळी ही थेट गरिबांना स्वस्तात भोजन देणारी योजना असेल. उद्योग, गुंतवणूक, रोजगारावरही लक्ष्य केंद्रीत करावे लागेल. काँग्रेस, राष्ट्रवादीत अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, अजित पवार, छगन भुजबळ,जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, असे एकसे एक दिग्गज मंत्री असताना याकूब मेमनची फाशी रद्द या की करावी म्हणून तेव्हा मागणी करणा! अस्लम शेख यांना काँग्रेसच्या कोट्यातून मंत्रीपद दिले म्हणून सोशल मीडियावर टीकेचे फटाके वाजविले जात आहेत उदव ठाकरे यांचे - संयमी, प्रामाणिक नेतृत्व ही सरकारची मोठी जमेची बाजू आहे. खाते वाटप पार पडले, चला आता सरकार जनतेला दिसू दे...