ठाणे : व्हॉट्सअप ग्रुपवरील ठाणे महापालिका आयुक्तांच्या शिवराळ शब्द प्रयोगानंतर गेल्या चार-पाच । दिवसांपासून पालिका आणि राजकीय वर्तुळात 'वासनांध' चर्चांना उधाण आले आहे. पूर्वी दबक्या आवाजात केली मुली जाणारी 'वासनांध' चर्चा आता खुलेआम सुरु होऊन अधिकाऱ्यांतील अंतर्गत वादामुळे एकमेकांची पडद्यामागची 'लफडी' रंगमंचावर आणण्याचे प्रकार सरू झाले आहेत. पालिका आणि राजकीय वर्तळातील चर्चा ऐकन हे ठाणे महापालिकेचे 'मुख्यालय' आहे की पुण्याच्या बुधवार । पेठेतील 'वेश्यालय' आहे? असा संतप्त सवाल ठाणेकर विचारू लागले आहेत. सध्या सुरू असणाऱ्या वासनाध चर्चानुसार ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात कामे काढून निर्णयासाठी घेण्यासाठी राजरोस महिला - मुलींची निलामी होत असेल तर ही ठाणेकरांसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. मुख्यालयात महिला-मुलींच्या निलामीचा प्रकार घडत असेल तर मख्यालयावरील छत्रपती शिवरायांचे शिल्प उतरवन तिथे पुण्याच्या बुधवार पेठेतील वेश्यालयाची प्रतिकृती बसविण्याची संतप्त मागणी ठाणेकरांतून होत आहे
ठाण महापालिका आयक्तानी गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. मात्र मलाईटार विभाग न मिळाल्याने किंवा हातातन गेल्याने नाराज झालेल्या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांकडे धाव घेतली. विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर आपला निर्णय मागे घेण्याची नामुष्की आयुक्तांवर ओढवली. नामुष्की जिव्हारी लागल्याने आयनांनी विरोधात गेलेल्या अधिकाऱ्यांनी डॉस ग्रुपवर आई - मुलगी काढली आणि इथूनच वादाला तोंड फुटले. ठाणे महापालिकेच्या सचिवांनीही सदर प्रकाराला दुजोरा देत वकिलांचा कायदेशीर सल्ला घेऊन आयुक्तांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले असले तरी सदर प्रकाराने यापूर्वी दबक्या आवाजात होणारी वासनांध चर्चा आता खुलेआम सुरू झाली आहे. कोणी कुठे कुठे किती महिला - मुली वापरल्या, कुणी कोणा- कोणाला महिलामुली पुरवून आपली कामं काढून घेतली आहेत, आपली वासना शमविण्यासाठी कोणी कोणाची नियुक्ती केली, कोणी कुणाला बढती दिली, कोणी कुणाची गोची केली याबाबत पालिका आणि राज
कीय वर्तुळात खुलेआम चर्चा सुरु झाली आहे. बदल्यांचे राजकारण आणि आयुक्त-अधिकाऱ्यातील वादालाही 'बाई'च कारण ठरले असल्याचे बोलले जात आहे. ठाणेकरांच्या विकासाचे धोरण मुख्यालयातूनच ठरविलं जाते. अंतिम निर्णय हा मुख्यालयातूनच होत असतो. ज्या ठाणेकरांच्या करातन मख्यालयातील कारभार चालतो त्या मख्यालयात 'अंतिम' निर्णयासाठी महिला-मुली निलाम होत असल्याच्या चर्चेने पालिका आणि राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वसामान्य ठाणेकर आपल्या किरकोळ कामासाठी मुख्यालयात हेलपाट्यांवर हेलपाटे मारताना दिसतो. मात्र, बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, राजकीय पदाधिकारी आणि दलाल यांची कामं पटापट होताना दिसतात.
त्याला कारणही तसेच असल्याचं सांगण्यात येतं. अधिकाऱ्यांतील अंतर्गत वादामुळे आता त्यालाही तोंड फुटले आहे. बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार, राजकारणी आणि अन्य दलाल आपला काम काढून घेण्यासाठी नोटाच्या बॅगबरोबर अधिकाऱ्यांना महिला - मुलीही राजरोसपणे पुरवित असल्याची खुलेआम चर्चा सुरू झाली आहे. पैशांसोबत महिला-मुली पुरविल्या की कामं प्रचड गतीने होतात, रखडलेली कामं तत्काळ निकाली निघतात, त्यासाठी प्रसंगी नियमही धाब्यावर बसविले जातात. कित्येकजण तर महिला- मुलींना सोबत घेऊनच काम घेऊन येतात. त्यामुळं फाईलवर तत्काळ सही होते. पुढचा कार्यक्रम शक्य असेल तर केबिनमध्येच किंवा मिटिंगचे निमित्त करून बाहेर जाऊन उरकला जात असल्याचे बोलले जात आहे.
ज्यांना महिला-मुली घेऊन जाणे शक्य नाही ते आपल्या स्मार्ट फोनमध्ये काही महिला-मुलींचं 'विविधांगी' चित्रण घेऊन जातात, त्याचं अधिकाऱ्यांना 'दर्शन' केले जाते, त्यातून पसंती केली जाते. काम घेऊन आलेला हॉटेलचं बुकिंग करून देतो आणि शिक्कामोर्तब होताच फाईलवर अधिकाऱ्यांची सही-शिक्का उमटत असल्याची चर्चा आहे. हा प्रकार केवळ बांधकाम व्यावसायिक, ठेकेदार आणि दलाल यांच्याकडूनच सुरू आहे असे नाही. तर अधिकारीही आपले काम काढून घेण्यासाठी वरिष्ठांना आणि सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना महिलामुलींचा पुरवठा करीत असल्याची खुलेआम चर्चा सुरू आहे. काही महाशयांनी तर मुख्यालयाचाच कोठा करून टाकला असल्याची चर्चा आहे.
बाहेर कुठेतरी गेल्यानंतर आपण कोणाच्यातरी नजरेत येऊ अशी भीती असल्याने किंवा दलालाने आणलेली मुलगी - महिला पाहून 'उसळले'ल्या भावना अनावर न झाल्याने कित्येक जण केबिनमध्येच आपली वासना शमवित असल्याचीही चर्चा आहे. काही अधिकाऱ्यांनी तर आपली वासना शमविण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची आपल्या मर्जीनुसार नियुक्ती केल्याची आणि शासनाकडून प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या काही महाशयांनी तर स्वतःच्या बदलीनंतर आपल्या इच्छित महिला कर्मचाऱ्यांनाही आपल्यासोबत नेल्याचे बोलले जात आहे. या प्रकारात महिलांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहेकाही महिलांनी तर लाज सोडून 'कुछ पाने के लिए, कुछ देना पड़ता है' असे म्हणत 'बाजार'च मांडला असल्याची चर्चा आहे.
आपल्या कामानिमित्त एखादी सर्वसामान्य महिला मुख्यालयात गेली शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरा वकवकलेल्या असतातअसा अनुभव अनेक महिला खाजगीत सांगतात. एकूणच काय ज्या मुख्यालयातून ठाणेकरांच्या हिताचे धोरण राबवले जाते. निर्णय घेतले जातात तेच मख्यालय आता या बनू पाहत असल्याचे चर्चावरून समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानणाऱ्या शिवसेनेची सत्ता असणाऱ्या ठाणे महापालिकेत असा प्रकार सर्रास घडावा हे शिवसेनेच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या मुख्यालयावर छत्रपती शिवरायांचे शिल्प कोरण्यात आलेले आहे. मुख्यालयावर शिवरायांच्या विचारांचा वारसा आणि आत छत्रपती शिवरायांच्या विचारांची घोर विटंबना... असं होत असेल तर वासनांधाचा वावर असणाऱ्या मुख्यालयावरील छत्रपती शिवरायांचे शिल्प उत्तरवून त्या ठिकाणी पुण्याच्या बुधवार पेठेतील वेश्यालयाच्या शिल्पाची प्रतिकृती उभारावी, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाणेकरांतून उमटत आहे.