प्लास्टिक मुक्ति

सा धारणपणे विस ते पंचवीस वर्षांपूर्वी कागदाच्या पुढीतून किराणाचे सामान दिले जायचे. साखर, तांदळ, गह हे पाच ते दहा किलो वजनासाठी कागदी जाड पिशवी वापरताना फाटण्याची भिंती असायची. साहजिकच त्याला प्लास्टिक पिशवी पर्याय ठरु लागल्या आणि हळूहळू लोकांच्या मनात घर करुन बसली ती आज तागायत लोकाच्या मनातून गेलेली नाही. इतकी सवय झाली कि लोक बाजारात जाताना आपली कापडी पिशवी हमखास विसरतात किंबहुना नेत नाहीत. प्लास्टिकच्या पिशव्या, वस्तू, खेळणी हजारो वर्षांपर्यंत नाश पावत नाहीत. मुख्य म्हणजे प्लास्टिकचे विघटन होत नाही. आपल्या आजूबाजूला पाहिले तर सर्वत्र प्लास्टिटच्या वस्तू नजरेत समोर येतात. पेन, ग्लास, घड्याळं, मोबाईल, खुर्ची, पाण्याची बाटली, प्लास्टिकची पिशवी यांच्याशिवाय तर आपला दिवस जात नाही. रोजच्या वापरातल्या या वस्तू असलेल्या कारणाने उद्योजक याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात. या वस्तूंचा वापर संपल्यावर त्याचे रुपांतर घन कचऱ्यात होते. प्लास्टिकमुळे नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण होण्याबरोबरच पर्यावरणाचा हास होत आहे. प्लास्टिक पिशवी बंद करणे ही काळाची गरज तर आहेच. प्लास्टिकमुळे प्राणीमात्रांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. प्लास्टिक पिशवीमधून टाकलेले अन्न पिशवीसह मुक्या जनावरांच्या पोटात जाते आणि त्यांना प्राणास मुकावे लागते. देवाला वाहिलेले हार नदी, खाडीत विसर्जित करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर जातो. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा जमा होऊन खाड्यामधून पाणी मार्गक्रमण करीत नाही. परिणामी पावसाळ्यात पुरसदृश परिस्थिती निर्माण होते. प्लास्टिक वापराबाबत नागरिकांत जागरुकता नसल्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे महानगरपालिकेला त्रासदायक ठरत आहे. हे जाणून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून 'स्वच्छता हिच सेवा' या विचाराने नागरिकांमध्ये प्लास्टिक किती घातक आहे, याची जनजागृती करुन ते न वापरण्याचे मनपरिवर्तन करण्याचा ध्यास घेऊन एक इसम गेल्या चार महिन्यांपासून प्रयत्न करतोय. त्यांचं नाव आहे दिनेश सिंग, नवी मुंबईतील रहिवासी असणारे ४५ वर्षीय दिनेश सिंग यांनी गेल्या पंधरा आठवड्यापासून स्वच्छता हिच सेवा, प्लास्टिक पिशव्या टाळा' असा फलक हातात घेऊन ठिकठिकाणी जनजागृती सुरू केली आहे. बाजारपेठ, गर्दिच्या ठिकाणी, रस्त्यावरुन फिरताना दिनेश नागरिकांना प्लास्टिक पिशवी न वापरण्याची विनंती करून प्लास्टिकच्या दष्परिणामांची . माहिती देतात. शिवाय किती लोकांनी व 3 दुकानदार मालकांनी त्यांच्या जीवनातून प्लास्टिक यशस्वीरीत्या सोडून कापडी – कागदी पिशव्यांचा वापर सुरु केला आहे याचे निरिक्षणही त्यांनी नमूद केले आहे. आतापर्यंत त्यांनी मुंबई, नवी . मुंबई आणि ठाणे शहरात ५४ ठिकाणी सर्वे क्षण केले आहे. या कालावधीत त्यांनी तीन महानगरपालिकांच्या २२ वॉडमधील बाजारपेठ, व्यस्त रस्ते आणि रेल्वे स्टेशन परिसराचा दौरा केला आहे. प्लास्टिक किंवा बिगर प्लास्टिक संबई, नारिकाना वस्तुच्या पिशव्या घेऊन जाणाऱ्या सहा हजार ६७४ लोकांची नोंद केली. सरासरी ५९ टक्के नागरिक बिगर प्लास्टिकच्या पिशव्या वापरत आहेत. याच काळात ६८७ दुकानांच्या सर्वेक्षणात फक्त ७४ दुकानदार त्याच्या व्यवसायात बिगर प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करताना आढळले. एकूणच काय तर दुकाने आणि फेरिवाल्यांकडून प्लास्टिक नसलेल्या पिशव्यांचा वापर केवळ ११ टक्के आहे. या दुकानदारांचे म्हणणे आहे की बिगर प्लास्टिक पिशवी महाग आहे. नागरिक मोफत पिशवीची मागणी करतात. अन्यथा ते वस्तू खरेदी करायची नाही असे सांगतात. ही समस्या भाजी, चिकन आणि मासे विक्री दुकानात जास्त प्रमाणात पाहण्यात आली आहे. हे निरीक्षण त्यांनी इमेल द्वारा स्थानिक महानगरपालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठवले आहे. प्लास्टिकवर पूर्णपणे अवलंबून न राहता नवीन पर्यायांचा शोध घेणे आणि नागरिकांचे विचार बदलणं गरजेचं आहे. या जनजागृतीला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. समाज माध्यमांच्या माध्यमातून हे निरीक्षण लोकांपर्यंत पोहचविण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या वैयक्तिक जीवनात प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याचे ठरविल्यानंतरच प्लास्टिक मुक्तीचे ध्येय सध्या होईल. - राजू पिगळे, ठाणे. (९८१९७५४६३९) नारिकाना