ठामपा अग्निशमन विभागाचा निर्लज्जपणा

निर्लज्जम् सदासुखी


काय कारवाई करायची याची माहिती नाही तर पगार कसला घेतात?


ठाणे : ठाणे महानगरपालिका मुख्य अग्निशमन अधिकारीपदी नियुक्त असणारे शशिकांत काळे यांना तक्रार अर्ज आल्यानंतर काय कारवाई करायची? याबाबतची माहितीच नसल्याचे उपलब्ध कागदपत्रावरून सिद्ध होत आहे. नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर एखाद्या अधिकार्याला काय कारवाई करायची याचे जर ज्ञान नसेल तर त्यांना आपण कशाचा पगार घेतो याची लाज कशी वाटत नाही हा प्रश्न तयार होतो


ठाण्यातील नामांकित कौशल्य फाऊंडेशन ट्रस्ट रुग्णालय येथे तळघरामध्ये एक्सरे, सोनोग्राफी, ममोग्राफी, स्ट्रेस्ट टेस्ट, सी.टी. स्कॅन अशा व्यावसायिक वापरच्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या, ज्या तळघरात सुरू ठेवणे चुकीचे होते. त्यावर तक्रारदार यांनी दि. १७/०१/२०१९ रोजी रितसर तक्रार करत मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून ___ त्यानुसार स्थानक अधिकारी एस.एन. सहारे यांनी दि.२३/०१/२०१९ रोजी कलम ५(१) व नियम ७(१) नुसार दिले. नोटीस बजावली. दि.२४/०१/२०१९ रोजी त्यांनी केलेल्या पाहणीनुसार रुग्णालय व्यवस्थापनास खालील मुद्द्यांच्या आधारे कलम ६ व नियम ९(१) नुसार तपासणी दरम्यान आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजनासंबंधातील अपर्याप्तते संबंधीची किंवा उल्लघनासंबंधीची नोटीस दिली. १) सदर आस्थापनेचा अग्निशमन विभागाकडील ना हरकत दाखला सादर करावा. २) सदर आस्थापनेबाबत आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना केल्याबाबतचा लायसन्स प्राप्त अभिकरणाकडील विहित नमुन्यामधील फॉर्म बी सादर करावा. ३) सदर आस्थापनेस बेसमेंट, किचन व मेडिकल इत्यादीचे महापालिकेकडे मंजूर आराखडे सादर करावेत. ४) सदर आस्थापनेचा वापर परवाना सादर करावा. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ चे कलम ७ (१) अन्वये नोटीसचे पालन न केल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे नमूद करत नियम ६ नुसार सक्षम अधिकारी म्हणून स्थानक अधिकारी एस.एन.सहारे यांनी सदर नोटीस दिली. 


नोटीस दिल्यानंतर संबंधित रुग्णालयावर कोणती कार्यवाही झाली यासाठी तक्रारदार यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली असता जन माहिती अधिकारी यांनी कौशल्या मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटलबाबत मागितलेली माहिती ही कोणत्या प्रयोजना करता पाहिजे हे स्पष्ट होत नाही. तसेच सदर माहिती प्रकट केल्याने त्रस्त पक्षाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहोचेल किंवा कसे हे देखील स्पष्ट होत नाही. त्यामुळे माहिती देता येत नाही, अशा हास्यास्पद प्रकारचे उत्तर दिले. त्यामुळे संबंधित तक्रारदार यांनी अपिलीय माहिती अधिकार सादर केला. त्यावर अपिलीय प्राधिकारी तथा मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांनी दिलेल्या आदेशामध्ये जन माहिती अधिकारी यांनी अपिलार्थी यांना दिलेली माहिती ही बरोबर आहे. तसेच माहिती विहित वेळेत देण्यात आली आहे. अपिलार्थी यांनी माहिती अधिकारांतर्गत विचारण्यात आलेल्या माहितीबाबत अपीलकर्त्याचे समाधान झाले असून सदरचा अपील अर्ज निकाली काढण्यात आला असल्याचे संबंधित अपिल करता यांना सांगण्यात आले आहे, असे म्हटले आहे. अपीलकर्ता यांनी देण्यात आलेली माहिती चुकीची असल्याचे सांगूनही नियमांकडे दुर्लक्ष करत अपील अर्ज निकाली काढण्यात आला. तक्रारदार यांनी माहिती अधिकारात सदर तक्रार अर्जावर कोणत्या स्वरुपात कार्यवाही करण्यात आली एवढीच माहिती विचारलेली होती. यामुळे रुग्णालयाच्या स्पर्धात्मक स्थानाला हानी पोहोचण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मात्र कोणत्या स्वरूपात कार्यवाही करायची याची वैचारिक पातळी नसलेले अधिकारी किंबहुना ज्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने निलंबित केलेले आहे असे शशिकांत काळे यांना ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारीपदी बसविल्याने ठाण्याचे वाटोळे होत आहे.