अच्छे दिन भोवले, महाराष्ट्रापाठोपाठ झारखंड गेले

देशातील जनतेने बहमत दिल्याचा कांगावा करण्यासाठी भाजपमध्ये सोशल मीडियाप्रमाणे एक टीमच कार्यरत आहे. या टीमचं कामच आहे. मोदी... मोदी म्हणत जनमानसात प्रचार करून सर्वसामान्य मतदारांच्या मनावर मोदी बिंबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण आज मोदी लाट गेली. आता खाट उभी करण्याची पाळी येऊन ठेपलेली आहे. भाजपच्या हातातला महाराष्ट्रासोबत आता झारखंडही गेला. उद्या आणखीन राज्य जातील आणि पुढच्या लोकसभेपर्यंत निःश्चितच मोदी ही जातील यात शंका नाही. मोदीला अच्छे दिन भोवले. आज महाराष्ट्रात गंडांतर होताच गोव्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. झारखंड हातून गेला. उद्या राज्यस्थान, उत्तरप्रदेश जाणार आहे. थोडक्यात खोटी आश्वासने दिली आणि लोकांना गृहीत धरले म्हणून ही परिस्थिती ओढवली. याचाच अर्थ यापूर्वीच्या नेत्यांनी किंवा सत्ताधीशांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असे नाही. तेही मर्यादा पुरूषोत्तम नाहीत. पण चार खोटे बोलले आणि चार खरे बोलले आणि केले. म्हणून ते सरस ठरले आहेत. दुसरीकडे तुम्ही खोटे आश्वासने देता आणि त्यावर बोलायला तयारही होत नाही. का अडचणी आल्या? कुणी आश्वासने पूर्ण होऊ दिली नाहीत ? विरोधकांनी आडकाठी केली काय ? याचा प्रश्नच उदभवत नाही. कारण तुमच्याकडे बहमताची सत्ता होती दोन्हीकडे केंद्रातही आणि महाराष्ट्रातही मग भरीव कामगिरी आणि पुन्हा निवडून येण्याची परिस्थिती का निर्माण करता आली नाही. म्हणूनच कोंडी झालेले आणि इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थिती असलेले काय बोलणार हे जनतेने ओळखले आहे.