ख्यमत्री शिवसेनचाच, असे शिवसेना निवडणूक प्रचार काळात ठणकावून सांगत होती आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रातील प्रचारसभेत जाहीर करीत होते. स्वतः देवेंद्र हे तर मी पुन्हा येईन, असे घसा फोडून सांगत होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी क्रिकेट आणि राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकते, हारत चाललेला सामना जिंकला जाऊ शकतो, असे भाकीत वर्तवले होते, नेमके महाराष्ट्राच्या राजकारणात तेच घडले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष परस्परांच्या विरोधात लढले. ज्यावेळी भाजपचे १२२ आमदार निवडून आले आणि भाजपचे सरकार स्थापन होणार, असे स्पष्ट दिसू लागले तेव्हा दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र असे फलक झळकले होते. त्याचवेळी भाजपचे निष्ठावान नेते एकनाथ खडसे व सधीर मुनगंटीवार यांनी आपणही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहोत, असे जाहीर करून पक्षात सर्वकाही अलबेल नाही हे दाखवून दिले. पण मोदी-शहा यांचे आशीर्वाद देवेंद्र यांच्या पाठिशी असल्याने देवेंद्रच राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि वसंतराव नाईकांनंतर सलग पाच वर्षांची टर्म पूर्ण करणारा महाराष्ट्राचा दुसरा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विक्रम नोंदवला.
त्यांनी विक्रम नोंदवला. सरकारमध्ये पाच वर्षे सहभागी असूनही शिवसेना व भाजप यांचा संसार हा सुखाचा नव्हता. भाजपने शिवसेनेला केवळ मंत्रीपदे दिली होती, पण कोणतेही अधिकार दिले नव्हते. निर्णय प्रक्रियेत तर भाजपने शिवसेनेला हिंग देवेंद्र व उद्धव यांनी एकमेकांच्या कानात काय कुजबूज केली, हे त्यांनाच ठाऊक, पण त्यात कुठेही आश्वासकता नव्हती. ___उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमत्री म्हणून शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विधानसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी आली, हा नियतीचा खेळ आहे. उद्धव यांनी कधीही आपल्याला मुख्यमंत्री त्यांच्या मनातही नव्हते. उलट देवेंद्र ‘मी पुन्हा येईन' असा जप करीत महाराष्ट्राच्या सर्वो च्च पदासाठी हपापलेले दिसले. विधानसभेचा निकाल लागेपर्यंत यतीचे सरकार येणार शिवसेनेला एखादे खाते जास्त दिले की शिवसेना सत्तेत सहभागी होणार, असे भाजपने गद्रित धरले होते पण शिवसेना अटिन वर्षे मख्यमंत्रीपदासाठी हटन बसली आणि सर्वाधिक आ श्रीया मातोश्री पक्षात बसण्याची वेळ आली. त्यात पुन्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देऊन राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपने केलेला प्रयत्न फसला आणि साया देशात भाजपची नाचक्की झाली. अंधार्यो रात्री राष्ट्रपती राजवट उठवन पहाटे पहाटे देवेंद्र व अजितदादा यांनी शपथ घेतल्यावर यापूढे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्याला पाच वर्षे स्थिर सरकार देईल, असे त्यांनी जाहीर केले होते. पण विश्वासदर्शक ठरावावर उघड मतदान घ्या व त्याचे लाईव्ह टेलिकास्ट करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर कोणाची फाटली. हे सार्याच देशाने बघितले. सत्तेसाठी कोण किती लाचार होऊ शकतो. याचे तेव्हा दर्शन झाले. आता आम्ही नियम याचे तेव्हा दर्शन झाले. आता आम्ही नियम आणि घटनेनुसार विधिमंडळात काम करणार, असे फडणवीस सांगू लागले आहेत. याचा अर्थ २३ तारखेचा राम प्रहरीचा गुपचूप पार पाडलेला शपथविधी लोक विसरले आहेत, असा नव्हे.
शिवाजी पार्क मैदानावर झालेला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाले, म्हणून राज्यपालांनी नाराजी प्रकट केली. पण रातोरात राष्ट्रपती राजवट उठवून भल्या पहाटे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात सरकारचा लपून छपून शपथविधी झाला, त्याबद्दल भाजपने आज तागायत 'ब्र' काढला नाही. शिवाजी महाराज, शाहू महाज, म. फुले ही सर्व श्रध्दा स्थाने आहेत. शपथ घेताना कोणी आई-वडिलांचे स्मरण केले तर ते घटनाबाह्य म्हणून थयथयाट करणारे लोकसभेत जय श्रीरामचा जप केला जात असताना गप्प का बसले? विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत झाल्यावर नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्याची संधी भाजपने गमावली, ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून मोठी चूक केली. पण दुसचि दिवशी विधासभा अध्यक्षपदावर नाना पटोले दिवशी विधासभा अध्यक्षपदावर नाना पटोले याचा बिनविरोध निवड करून ही चूक सुधारली. उद्धव ठाकरे हे आता केवळ शिवसेना पक्षप्रमुख नाहीत, तर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे नेते आहेत. शिवसेनेचे केवळ ५६ आमदार निवडून आलेले आहेत. २८८ सदस्यांच्या विधानसभेत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. आता शिवसना, काग्रेस व राष्ट्रवादी काग्रस अशा तीन प्रमुख पक्षाच्या आघाडी सरकारचा नवा प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाला आहे. त्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुकी लढवल्या आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादी हे पक्ष तर शिवसेनेचे गेली तीन दशके विरोधक आहेत. पण या तिन्ही पक्षांनी आपल्या आचारविचाराला मुरड घालून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आघाडी केली आहे. शिवसेना आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष आहे. मुख्यमत्री झाल्यापासून उद्धव यांनी अंगावर भगव्या रंगाचा कुर्ता ठेवला आहे. पण सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालवले जाईल. यावर तिन्ही पक्षांचे एकमत आहे. उद्धव हे आमदार नाहीत, कधी त्यांनी निवडणूक लढवली नाही. ते थेट एकदम मुख्यमंत्री झाले. प्रशासकीय कोणता अनुभव नाही. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची तिन्ही पक्षांनी सहमतीने निवड केली असली तरी त्यांना सरकार चालविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीची सदैव साथ आवश्यक आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे शिवधनुष्य उचलले आहे. पण शरद पवार व सोनिया गांधी ही त्यांच्या रथाची चाके आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले म्हणून शिवसैनिकांना आनंद झाला, पुन्हा आपले सरकार आले म्हणून काँग्रेस- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खूश झाले. पण सर्वसामान्य जनतेला ही तीन चाकांची रिक्षा पचनी पडायला वेळ लागेल. आम्ही युती सरकारसाठी शिवसेनेला मते दिली होती, काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी नव्हे, असे भाजप समर्थकांनी गळे काढायला सरुवात केली आहे. मग देवेंटने अजितदादांना बरोबर घेऊन भाजप यादी सरकार स्थापन केले तेव्हा हे भक्त कुठे स्टेटलाइन गेले होते? भाजपने सत्तेसाठी मेहबुबा मुफ्तीपासून ते नीतिशकुमार, चंद्राबाबू, खांडेकर ममता, जयललिता आदींना बरोबर घेऊनही प्रयोग केले आहेत, त्यामुळे भाजपला महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर नाके मुरडण्याचा नैतिक अधिकारच नाही. अजित पवार हे भाजपच्या भोज्याला शिवून परत आले असले तरी परत ते काही विचित्र वागणार नाहीत, याची कोणी हमी देऊ शकत नाही. १०५ आमदारांचा विरोधी तगडा पक्ष महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला सुखाने राज्य करून देणार नाही. आम्ही परत सत्ताधारी बाकांवर येऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यावर जाहीर केले आहे, म्हणजेच भाजपने तोडफोडीचे राजकारण अजून थांबवलेले नाही, हाच इशारा आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचा परिणाम जिल्हा, तालुका पातळीवर पडणार अ स्वराज्य संस्थामध्ये समिकरणे बदलणार आहेत. जे गेल्या पाच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले त्यांची घरवापसी सुरू होईल. हर्षवर्धन पाटील, राणा जगजित सिंग, शिवेंद्र राजे भोसले, उदयनराजे भोसले, जयकुमार गोरे, वैभव पिचड, कालिदास कोळंबकर, नितेश राणे, राधाकृष्ण विखे-पाटील, राह नाईक, विजयसिंह मोहिते-पाटील असे चार डझन नेते व त्यांच्या परिवाराने निवडणवीपी भाजपमध्ये मोठ्या आशेने प्रवेश केला, त्यांचे आता काय होणार, याकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही पाच लाल को कर्ज राज्यावर असताना सरकार चालवणे हे सोपे नाही, मुख्यमंत्र्यांच्या मस्तकावर काटेरी मुगूट आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात सहमती आहे तोपर्यंत या सरकारला धोका निर्माण होणार नाही