संबंधित विकासकाने खोटी व दिशाभूल करणारी माहिती सादर केली आहे किंवा कसे याची खातर जमा केली नाही. मंजूर आराखडा आणि प्रत्यक्षात दर्शविण्यात आलेली खुली जागा यात तफावत असलेली बाब हेतुपूर्वक दुर्लक्षित केली. अग्निशमन दलाच्या उपरोक्त 'ना हरकत प्रमाणपत्रात सदर इमारतीस ४:५ मीटर्स रुंदीची दोन प्रवेशद्वाराची तरतूद असल्याचे दर्शविले आहे. तथापि, वास्तुविशारदाने ना हरकत प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या मंजूर आराखड्यात मात्र भूभागाची स्थिती रचना पाहता प्रवेशद्वारासाठी जागा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होत आहे. हि बाब हेतुपुरस्सर दुर्लक्षित केली. अग्निशमन दलाच्या ना हरकत प्रमाणपत्रात १९९१ मधील तरतूद क्र. १७ (२) चा भंग होत आहे. या बाबीकडे हेतुपुरस्सर दर्लक्ष केले. अग्निशमन दलाच्या उपरोक्त ना हरकत प्रमाणपत्रासंदर्भात अहवाल तयार करते वेळी १९९१ मधील तरतूद क्र. १७ (१) कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. वरील सर्व मुद्दे विचारात घेता दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाची फायर फायटिंग व्हेईकल दुर्घटना स्थळी पोचू शकणार नाही, हे स्पष्ट असूनही त्यांचाकडे पूर्णत दुर्लक्ष केले.
या मुद्यांमुळे बृहन्मुंबई महापालिकेने केले होते काळेचे निलंबन
• मुख्यमंत्री