सीआयडी चित्रपटातील जॉनी वॉकरवर चित्रित केलेले हे गाणे आजही मुंबईचे जीवन जगताना आपल्याला खरी अनुभूती देऊन जाते. खरंच मुंबईत जगण्यासाठी किती धडपड करावी लागते? जसं आपण म्हणतो की, टमुंबईमध्ये जगण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो.' अरे हे काय? आता तर मुंबईला रात्रीचा सुध्दा दिवस करता येणार आहे.' नाईट लाईफ' ही संकल्पना २७ जानेवारीपासून प्रत्यक्षात अमलात आणली जाणार आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात मॉल्स, हॉटेल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपट गृह रात्र भर सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे पब, बार, दारूची दुकाने, रात्री एक ते दीड वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत (सध्या तरी सरकारच्या म्हणण्यानुसार). राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत २२ जानेवारीला प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. ___ सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील नाईट लाईफ या प्रस्तावाला विरोध होता, त्यांच्यात धुसफूस सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून फेरविचार करावा हा प्रस्ताव मांडला होता. पण शेवटी हा प्रस्ताव राज्यमंत्री मंडळात मान्य करण्यात आला आणि लगेच पत्रकार परिषद घेऊन तसे जाहीर करण्यात आले. 'नाईट लाईफ' चा अट्टाहास का? तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ह्यांची ही संकल्पना ही संकल्पना महायुतीच्या काळात देखील राबवण्याचा प्रयत्न झाला होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी त्याचे दष्परिणामाबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे हा प्रस्ताव धूळ खात पडला होता. खर तर सप्टेंबर २०१७ मध्ये सातही दिवस २४ तास शॉप, मॉल उघडी ठेवता येणार आहे.
२४/७ सुरू ठेवण्याचे बंधन नाही पण सरकार त्याला आडकाठी करू शकत नाही. असा कायदा केद्रात मोदी सरकारनेच केला आहे. त्यावर देवेन्द्र फडणवीस म्हणतात 'आम्ही कायदा केला होता.पण पोलीस आयुक्त व महानगर पालिका आयुक्त यांनी किती तास आस्थापना सुरू ठेवायच्या याचा निर्णय घ्यायचा होताबनाईट लाईफमुळे राजगार वाढणार, महसूल वाढणार, मोठ्या .त्यामुळे तो कायदा आजही लागू आहे. ___नाईट लाईफ मुळे रोजगार वाढणार, महसूल वाढणार, मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार हे जरी खरे असले तरी नाईट लाईफचे दुष्परिणाम किती होणार ह्याचा विचार पण केला पाहिजे. रात्रभर दुकाने चालू राहणार, शॉपिंग मॉल सुरू राहणार, त्यामुळे रात्रीची बस सेवा, रेल्वे सेवा, रुग्णालय सेवा, या सर्व गोष्टी देखील रात्र भर सुरू ठेवाव्या लागणार ह्या सर्वांचा अतिरीक्त ताण सुरक्षा यंत्रणेवर पडणार. अगोदरच चोऱ्या, दरोडे, बलात्कार या सारख्या गुन्हेगार प्रवृत्ती वाढत चालली आहे आणि जर रात्रभर मुंबई उघडी असेल तर पोलीस यंत्रणा कितपत आपल्याला सुरक्षितता देऊ शकते? रात्री एक ते दीड वाजेपर्यंत बार उघडे राहतील(सरकारच्या म्हणण्यानुसार). खरंच याची अमलबजावणी होईल ? आधीच आजची तरुण पिढी मॉल, पब, बार संस्कृतीत अडकली आहे. त्यांना तर ही मेजवानीच आहे. रात्री उशिरापर्यंत घरी जाणारे हे तरुण, तरुणी मग सकाळी घरी जाणार आणि ते पण सुरक्षित जाणार का? त्यात सामूहिक बलात्काराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे त्यात हे कितपत सुरक्षित आहे ? पालकांनी सकाळ होईपर्यंत मुलांची वाट पहायची? अशा पाल्यांना पालक कसे नियंत्रित करणार? हा गल्लेभरू प्रस्ताव नक्की कोणासाठी? ह्यात नेमका फायदा कोणाचा? ह्यात भाजपचे आमदार आशिष शेलार ह्यांचे म्हणणे बरोबर वाटते हे 'नाईट लाईफ ' नाही तर' किलीग लाईफ' आहे. - नंदकुमार देशपांडे, ठाणे