दरेकर यांना 'कोकनरत्न' आणि नितीन हासे यांना 'कोकण पत्रकार भूषण' पुरस्कार प्रदान
दिवा येथे रोहिदास मुंडे आयोजित अखंड कोकण महोत्सवचा कोकनरत्न पुरस्कार स्वीकारल्या नंतर दरेकर बोलत होते. या महोत्सवाचे उदघाटन माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी रोहिदास मुंडे यांच्या कामाचे कौतुक करून दिव्यात होणाऱ्या एकमेव कोकण महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. सेव्ह दिवा फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गणेशनगर ते महोत्सव मैदान अशी कोकणच्या ग्रामदैवताची पालखी मिरवणूक काढून अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या अखंड कोकण महोत्सवात दिव्याच्या सांस्कृतिक इतिहासात पहिल्यांदाच युवती व महिलांसाठी सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम देखील पार पडला. कोकणातील व दिव्यातील विविध मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकण रत्न पुरस्कार ने सन्मानित करण्यात आले. याशिवाय दैनिक सागरचे ठाणे संपादक नितीन हासे यांना कोकण पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर डॉ.,कुलदीप महाजन यांना दिवारत्न, किरण जाधव यांना सेवारत्न आणि रेल्वे अभ्यासक म्हणून अमोल कदम यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार व भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, भाजप नेते शिवाजी आव्हाड, राजश्री मुंडे, सचिन भोईर, आरती म्हात्रे, नरेंद्र म्हात्रे, नागेश पवार, निलेश पाटील, आदेश भगत आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.