ठाणे शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे म्हणूनच ठाण्यातील रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ठाणे (पूर्व) येथील भारत हायस्कूल समोरील रस्त्याचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. सध्या काम पूर्णावस्थेत आले आहे. पण काम करताना ठेकेदाराने बहुतेक केबल या रस्त्यांवर मोकळ्या ठेवल्याने नागरिक व दुचाकी वाहन चालकांना त्रासदायक ठरू लागले आहे. शेजारीच नौपाडा - कोपरी प्रभाग समिती अध्यक्षांचे कार्यालय असल्याने संबंधित समस्येवर अध्यक्षांनी लक्ष घालून समस्येचे निवारण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.